#OnThisDay in 2012: सचिन तेंडुलकरनं आजच्याच दिवशी ठोकलं होतं 'महा'शतक!

१६ मार्च २०१२ मध्ये सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'महा'शतकाची नोंद केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 12:18 PM2020-03-16T12:18:42+5:302020-03-16T12:20:07+5:30

whatsapp join usJoin us
On This Day in 2012, Sachin Tendulkar completed a century of international centuries svg | #OnThisDay in 2012: सचिन तेंडुलकरनं आजच्याच दिवशी ठोकलं होतं 'महा'शतक!

#OnThisDay in 2012: सचिन तेंडुलकरनं आजच्याच दिवशी ठोकलं होतं 'महा'शतक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

१६ मार्च २०१२ मध्ये सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'महा'शतकाची नोंद केली होती. आजच्याच दिवशी आशिया चषक स्पर्धेच्या ढाका येथे झालेल्या सामन्यात तेंडुलकरनं क्रिकेट चाहत्यांची एका वर्षांची प्रतीक्षा संपवली होती. २०११पासून तेंडुलकरला अनेकदा या महाशतकानं हुलकावणी दिली होती. २ जानेवारी २०११ आणि १२ मार्च २०११ मध्ये तेंडुलकरनं अनुक्रमे कसोटी व वन डेत झळकावलेल्या शतकानंतर संपूर्ण देश ज्या विक्रमाची आतुरतेनं वाट पाहत होते, तो विक्रम आजच्याच दिवशी २०१२ साली घडला. 

आशिया चषक स्पर्धेच्या त्या सामन्यात टीम इंडियाला यजमान बांगलादेशनं प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. गौतम गंभीर ( ११) सहाव्याच षटकात माघारी परतल्यानंतर तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. विराटनं ८२ चेंडूंत ६६ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सुरेश रैनानं ३८ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली. तेंडुलकरने एक बाजू लावून धरताना १४७ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार खेचून ११४ धावा केल्या. वर्षभर ज्या शतकाची प्रतीक्षा पाहत होते, तो क्षण हाच होता. भारतानं ५ बाद २८९ धावा केल्या. बांगलादेशविरुद्ध ११४ धावांची खेळी करून तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाचे शतक साजरे केले. असा पराक्रम करणारा तो जगातला एकमेव फलंदाज आहे.

तेंडुलकरच्या या महाशतकानंतरही टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. तमिम इक्बाल ( ७०), जहुरूल इस्लाम ( ५३), नासीर होसैन ( ५४), शकिब अल हसन ( ४९) आणि कर्णधार मुश्फीकर रहीम ( ४६*) यांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर बांगलादेशनं ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

तेंडुलकरच्या नावावर कसोटीत ५१ आणि वन डेत ४९ अशी एकूण १०० आंतरराष्ट्रीय शतकं आहेत. त्यानं कसोटीत १५९२१ आणि वन डेत १८४२६ धावा केल्या आहेत. 

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं

  • सचिन तेंडुलकर - १००
  • रिकी पाँटिंग - ७१
  • विराट कोहली - ७०
  • कुमार संगकारा - ६३
  • जॅक कॅलिस - ६२
     

Web Title: On This Day in 2012, Sachin Tendulkar completed a century of international centuries svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.