CPL Final : शाहरुख खानच्या संघानं जेतेपदाचा चौकार मारला; मुंबई इंडियन्सनं अनोखं सेलिब्रेशन केलं

CPL Final : मुंबई इंडियन्सचा ( MI) हुकमी एक्का किरॉन पोलार्डनं (Kieron Pollard) कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) दमदार कामगिरीचे प्रदर्शन दिलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 11:19 PM2020-09-10T23:19:34+5:302020-09-10T23:20:41+5:30

whatsapp join usJoin us
CPL Final : Trinbago Knight Riders won the CPL 2020, this is the fourth time they have become the champions | CPL Final : शाहरुख खानच्या संघानं जेतेपदाचा चौकार मारला; मुंबई इंडियन्सनं अनोखं सेलिब्रेशन केलं

CPL Final : शाहरुख खानच्या संघानं जेतेपदाचा चौकार मारला; मुंबई इंडियन्सनं अनोखं सेलिब्रेशन केलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगला ( Indian Premier League) सुरुवात होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ताफ्यात आनंदाचे वातावरण आहे. मुंबई इंडियन्सचा ( MI) हुकमी एक्का किरॉन पोलार्डनं (Kieron Pollard) कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) दमदार कामगिरीचे प्रदर्शन दिलं. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्सनं ( Trinbago Knight Riders) CPL 2020 सलग 12 सामने जिंकले. अंतिम फेरीतही रायडर्सची धडाकेबाज कामगिरी कायम राहिलेली पाहायला मिळाली. कर्णधार पोलार्डनं अंतिम सामन्यात डॅरेन सॅमीच्या सेंट ल्युसीआ झौक्स ( St Lucia Zouks) संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. त्याच्या भेदक माऱ्यासमोर झौक्सच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यानंतर लेंडल सिमन्स आणि डॅरेन ब्राव्हो यांनी दमदार फलंदाजी करून रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले. (Trinbago Knight Riders won the CPL 2020)


सुनील नरीनच्या अनुपस्थितीत रायडर्सचा कस लागेल असे वाटले होते, परंतु पोलार्डनं आपल्या अऩुभवाच्या जोरावर संघाला विजयाच्या दिशेने कूच करून दिली. प्रथम फलंदाजीला आलेल्या झौक्सच्या सलामीवीर रहकीम कोर्नवॉल ( 8) दुसऱ्याच षटकात अली खानच्या यॉर्करसमोर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मार्क डेयाल व आंद्रे फ्लेचर यांनी झौक्सचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून झौक्सला ट्रॅकवर आणले. पण, फवाद अहमदनं 9व्या षटकात डेयालला ( 29) बाद केले. त्यानंतर पोलार्डच्या भेदक माऱ्यासमोर झौक्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. फ्लेचर 39, रोस्टन चेस 22  आणि नजीबुल्लाह झाद्रान 24 धावांवर बाद झाले. या तिघांनाही पोलार्डनं बाद केले. (Trinbago Knight Riders won the CPL 2020)

त्यानंतर झौक्सची गाडी घसरली ती रुळावर आलीच नाही. त्यांचा संपूर्ण संघ 19.1 षटकांत 154 धावांत माघारी परतला. पोलार्डनं 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या. अली खान व फवाद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना रायडर्सचे दोन फलंदाज 10 षटकांत 60 धावांवर माघारी परतले होते. टिओन वेबस्टर ( 5) आणि टीम सेइफर्ट ( 4) यांना अनुक्रमे रोस्टन चेस व स्कॉट कुग्गेलेजीन यांनी माघारी पाठवले. 2 बाद 19 अशा अवस्थेत सापडलेल्या रायडर्सला सलामीवीर लेंडल सिमन्स आणि डॅरेन ब्राव्हो यांनी सावरले. या दोघांनी फटकेबाजी केली. सिमन्सनं 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. CPL 2020मधील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले आणि या खेळीसह CPLच्या या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान त्यानं पटकावला. (Trinbago Knight Riders won the CPL 2020)

सिमन्सपाठोपाठ ब्राव्होनेही अर्धशतक पूर्ण केलं. ब्राव्हो आणि सिमन्सनं शतकी भागीदारी करताना CPL Finalमध्ये विक्रमाची नोंद केली. CPL Finalमधील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. या दोघांनी एकतर्फी सामन्यात नाइट रायडर्सला 8 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. सिमन्स 49 चेंडूंत 8 चौकार व 4 षटकारांसह 84 धावांवर नाबाद राहिला, तर ब्राव्होनं 47 चेंडूंत 2 चौकार व 6 षटकारासह नाबाद 58 धावा केल्या. नाइट रायडर्सचे हे चौथे CPL जेतेपद आहे. याआधी त्यांनी 2015, 2017 व 2018 मध्ये जेतेपद पटकावले होते. (Trinbago Knight Riders won the CPL 2020)


CPL Finalच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 पूर्वी किरॉन पोलार्डचा दमदार फॉर्म; CPL Finalमध्ये डॅरेन सॅमीच्या संघाचा काढला घाम

प्रेक्षकांविना सामना म्हणजे, खेळाडूंच्या डोक्याला ताप; पाहा ICCनेही फिरकी घेतलेला मजेशीर व्हिडीओ

CPL Final किरॉन पोलार्डनं गाजवली; अनील कुंबळेच्या 11 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली, पण...

नाइट रायडर्सच्या फलंदाजाला डिवचणे महागात पडले; पाहा ब्राव्होनं कसा काढला वचला, Video

 

Web Title: CPL Final : Trinbago Knight Riders won the CPL 2020, this is the fourth time they have become the champions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.