CPL Final : नाइट रायडर्सच्या फलंदाजाला डिवचणे महागात पडले; पाहा ब्राव्होनं कसा काढला वचला, Video

CPL Final :सामन्यात विजय मिळवण्यासाठी झौक्सकडून सर्व प्रयत्न करण्यात आले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 10:52 PM2020-09-10T22:52:30+5:302020-09-10T22:53:05+5:30

whatsapp join usJoin us
CPL Final : A few mind games going on - but they don't appear to have flustered Darren Bravo, Watch Video | CPL Final : नाइट रायडर्सच्या फलंदाजाला डिवचणे महागात पडले; पाहा ब्राव्होनं कसा काढला वचला, Video

CPL Final : नाइट रायडर्सच्या फलंदाजाला डिवचणे महागात पडले; पाहा ब्राव्होनं कसा काढला वचला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगला ( Indian Premier League) सुरुवात होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ताफ्यात आनंदाचे वातावरण आहे. मुंबई इंडियन्सचा ( MI) हुकमी एक्का किरॉन पोलार्डनं (Kieron Pollard) कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) दमदार कामगिरीचे प्रदर्शन दिलं. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्सनं ( Trinbago Knight Riders) CPL 2020 सलग 11 सामने जिंकून ऐटीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीतही रायडर्सची धडाकेबाज कामगिरी कायम राहिलेली पाहायला मिळाली. कर्णधार पोलार्डनं अंतिम सामन्यात डॅरेन सॅमीच्या सेंट ल्युसीआ झौक्स ( St Lucia Zouks) संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. त्याच्या भेदक माऱ्यासमोर झौक्सच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यानंतर लेंडल सिमन्सनं दमदार फलंदाजी करून रायडर्सला विजेतेपदा नजीक आणले. पण, या सामन्यात विजय मिळवण्यासाठी झौक्सकडून सर्व प्रयत्न करण्यात आले. 

प्रेक्षकांविना सामना म्हणजे, खेळाडूंच्या डोक्याला ताप; पाहा ICCनेही फिरकी घेतलेला मजेशीर व्हिडीओ

CPL Final किरॉन पोलार्डनं गाजवली; अनील कुंबळेच्या 11 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली, पण...

सुनील नरीनच्या अनुपस्थितीत रायडर्सचा कस लागेल असे वाटले होते, परंतु पोलार्डनं आपल्या अऩुभवाच्या जोरावर संघाला विजयाच्या दिशेने कूच करून दिली. प्रथम फलंदाजीला आलेल्या झौक्सच्या सलामीवीर रहकीम कोर्नवॉल ( 8) दुसऱ्याच षटकात अली खानच्या यॉर्करसमोर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मार्क डेयाल व आंद्रे फ्लेचर यांनी झौक्सचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून झौक्सला ट्रॅकवर आणले. पण, फवाद अहमदनं 9व्या षटकात डेयालला ( 29) बाद केले. त्यानंतर पोलार्डच्या भेदक माऱ्यासमोर झौक्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. फ्लेचर 39, रोस्टन चेस 22  आणि नजीबुल्लाह झाद्रान 24 धावांवर बाद झाले. या तिघांनाही पोलार्डनं बाद केले.


त्यानंतर झौक्सची गाडी घसरली ती रुळावर आलीच नाही. त्यांचा संपूर्ण संघ 19.1 षटकांत 154 धावांत माघारी परतला. पोलार्डनं 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या. अली खान व फवाद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना रायडर्सचे दोन फलंदाज 10 षटकांत 60 धावांवर माघारी परतले होते. टिओन वेबस्टर ( 5) आणि टीम सेइफर्ट ( 4) यांना अनुक्रमे रोस्टन चेस व स्कॉट कुग्गेलेजीन यांनी माघारी पाठवले. 2 बाद 19 अशा अवस्थेत सापडलेल्या रायडर्सला सलामीवीर लेंडल सिमन्स आणि डॅरेन ब्राव्हो यांनी सावरले. या दोघांनी फटकेबाजी केली. सिमन्सनं 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. CPL 2020मधील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले आणि या खेळीसह CPLच्या या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान त्यानं पटकावला.

ही जोडी फोडण्यासाठी झौक्सच्या गोलंदाजांकडून काही डावपेच आखले गेले. पण, त्याला ब्राव्होनं जे प्रत्युत्तर दिले, ते पाहाच...

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

IPL 2020 : लाईक्स, कमेंट्स अन् गप्पाटप्पा; पृथ्वी शॉ अभिनेत्रीला करतोय 'डेट'? 

सानिया मिर्झा अन् शोएब मलिक यांची सात महिन्यांनी झाली भेट; पाकिस्तानी क्रिकेटपटूनं पोस्ट केला Video 

IPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या जेतेपदासाठी सज्ज; पण 'ही' कमकुवत बाजू करू शकते घात! 

भारतीय वायुसेनेत राफेल विमान दाखल; MS Dhoniने केलं अभिनंदन, सांगितलं फेव्हरिट विमानाचं नाव

CSKची स्ट्रॅटेजी ठरली, सुरेश रैनाच्या जागी उतरवणार स्फोटक ओपनर; शेन वॉटसननं सांगितला गेम प्लान

IPL 2020 Anthem चोरीचं? प्रसिद्ध रॅपरचा BCCIवर गंभीर आरोप

IPL 2020त भीमपराक्रम करण्यासाठी ख्रिस गेल सज्ज; रोहित, विराट यांनाही हा विक्रम मोडणे अशक्य!

Web Title: CPL Final : A few mind games going on - but they don't appear to have flustered Darren Bravo, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.