CPL Final : प्रेक्षकांविना सामना म्हणजे, खेळाडूंच्या डोक्याला ताप; पाहा ICCनेही फिरकी घेतलेला मजेशीर व्हिडीओ

CPL Final : कोरोना व्हायरसमुळे प्रेक्षकांविना क्रिकेट सामने खेळवले जात आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 10:29 PM2020-09-10T22:29:17+5:302020-09-10T22:30:31+5:30

whatsapp join usJoin us
CPL Final : Spot the ball, Mohammad Nabi's Operation ball search, watch Video | CPL Final : प्रेक्षकांविना सामना म्हणजे, खेळाडूंच्या डोक्याला ताप; पाहा ICCनेही फिरकी घेतलेला मजेशीर व्हिडीओ

CPL Final : प्रेक्षकांविना सामना म्हणजे, खेळाडूंच्या डोक्याला ताप; पाहा ICCनेही फिरकी घेतलेला मजेशीर व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगला ( Indian Premier League) सुरुवात होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ताफ्यात आनंदाचे वातावरण आहे. मुंबई इंडियन्सचा ( MI) हुकमी एक्का किरॉन पोलार्डनं (Kieron Pollard) कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) दमदार कामगिरीचे प्रदर्शन दिलं. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्सनं ( Trinbago Knight Riders) CPL 2020 सलग 11 सामने जिंकून ऐटीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीतही रायडर्सची धडाकेबाज कामगिरी कायम राहिलेली पाहायला मिळाली. कर्णधार पोलार्डनं अंतिम सामन्यात डॅरेन सॅमीच्या सेंट ल्युसीआ झौक्स ( St Lucia Zouks) संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. त्याच्या भेदक माऱ्यासमोर झौक्सच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. ( CPL Final Mohammad Nabi's Operation ball search)

CPL Final किरॉन पोलार्डनं गाजवली; अनील कुंबळेच्या 11 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली, पण...

सुनील नरीनच्या अनुपस्थितीत रायडर्सचा कस लागेल असे वाटले होते, परंतु पोलार्डनं आपल्या अऩुभवाच्या जोरावर संघाला विजयाच्या दिशेने कूच करून दिली. प्रथम फलंदाजीला आलेल्या झौक्सच्या सलामीवीर रहकीम कोर्नवॉल ( 8) दुसऱ्याच षटकात अली खानच्या यॉर्करसमोर त्रिफळाचीत झाला. ( CPL Final Mohammad Nabi's Operation ball search)


त्यानंतर मार्क डेयाल व आंद्रे फ्लेचर यांनी झौक्सचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून झौक्सला ट्रॅकवर आणले. पण, फवाद अहमदनं 9व्या षटकात डेयालला ( 29) बाद केले. त्यानंतर पोलार्डच्या भेदक माऱ्यासमोर झौक्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. फ्लेचर 39, रोस्टन चेस 22  आणि नजीबुल्लाह झाद्रान 24 धावांवर बाद झाले. या तिघांनाही पोलार्डनं बाद केले. ( CPL Final Mohammad Nabi's Operation ball search)

त्यानंतर झौक्सची गाडी घसरली ती रुळावर आलीच नाही. त्यांचा संपूर्ण संघ 19.1 षटकांत 154 धावांत माघारी परतला. पोलार्डनं 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या. अली खान व फवाद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

प्रेक्षक नसतात तेव्हा काय होतं?( CPL Final Mohammad Nabi's Operation ball search)
लक्ष्याचा पाठलाग करताना रायडर्सचे दोन फलंदाज 10 षटकांत 60 धावांवर माघारी परतले होते. टिओन वेबस्टर ( 5) आणि टीम सेइफर्ट ( 4) यांना अनुक्रमे रोस्टन चेस व स्कॉट कुग्गेलेजीन यांनी माघारी पाठवले. पण, सामन्याच्या पाचव्या षटकात एक मजेशीर किस्सा घडला. मोहम्मद नबी चेंडू शोधण्यासाठी प्रेक्षकांमध्ये गेला आणि तिथे जे झाले ते पाहाच...

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

IPL 2020 : लाईक्स, कमेंट्स अन् गप्पाटप्पा; पृथ्वी शॉ अभिनेत्रीला करतोय 'डेट'? 

सानिया मिर्झा अन् शोएब मलिक यांची सात महिन्यांनी झाली भेट; पाकिस्तानी क्रिकेटपटूनं पोस्ट केला Video 

IPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या जेतेपदासाठी सज्ज; पण 'ही' कमकुवत बाजू करू शकते घात! 

भारतीय वायुसेनेत राफेल विमान दाखल; MS Dhoniने केलं अभिनंदन, सांगितलं फेव्हरिट विमानाचं नाव

CSKची स्ट्रॅटेजी ठरली, सुरेश रैनाच्या जागी उतरवणार स्फोटक ओपनर; शेन वॉटसननं सांगितला गेम प्लान

IPL 2020 Anthem चोरीचं? प्रसिद्ध रॅपरचा BCCIवर गंभीर आरोप

IPL 2020त भीमपराक्रम करण्यासाठी ख्रिस गेल सज्ज; रोहित, विराट यांनाही हा विक्रम मोडणे अशक्य!

Web Title: CPL Final : Spot the ball, Mohammad Nabi's Operation ball search, watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.