Amit Shah invites Ganguly to BJP | सौरव गांगुलीचे आम्ही भाजपामध्ये स्वागतच करू - अमित शहा

सौरव गांगुलीचे आम्ही भाजपामध्ये स्वागतच करू - अमित शहा

मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. गांगुलीला अध्यक्षपदावर भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी बसवले, असे म्हटले जात आहे. शहा यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे, पण यावेळीच त्यांनी गांगुलीला भाजपाप्रवेशाचे आमंत्रण दिले आहे.

याबाबत अमित शहा म्हणाले की, " बीसीसीआयचा अध्यक्ष कोण व्हावा, हे मी ठरवू शकत नाही. ही बीसीसीआयची निववड प्रक्रीयाच करू शकते. जर गांगुलीला भाजपामध्ये यायचे असेल तर त्याचे आम्ही स्वागत करू."

सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बसवण्यात 'या' मोठ्या नेत्याचा हात
मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान होणार आहे. बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. पण एका मोठ्या नेत्याने आपले वजन वापरून गांगुलीचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे.

बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. अखेरीस सौरव गांगुलीच्या नावावर एकमत झाले. पण या बऱ्याच कालावधीमध्ये काही घडना पडद्यामागेही घडत होत्या. बीसीसीआयचा अध्यक्ष हा बिनविरोध निवडून यावा, यासाठी बरीच खलबतं सुरु होती. पण यावेळी एक मोठे भाजपाचे नेते यावेळी पडद्यामागून सूत्र हलवत असल्याचे समजते.

बीसीसआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना ब्रिजेश पटेल यांना अध्यक्षपदावर विराजमान करायचे होते. त्यांच्यासमोर बीसीसीआयचे माजी पदाधिकारी अनुराग ठाकूर यांचे कडवे आव्हान होते. पण यावेळी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपले वजन वापरल्याचे म्हटले जात आहे. अमित शहा यांच्या म्हणण्यानंतर गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्षपद देण्यात आले, असे म्हटले जात आहे. नॅशनल हेराल्ड या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Amit Shah invites Ganguly to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.