तुम्ही आधी रसद पुरवा, आम्ही मनसे काम करू; मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:18 AM2024-04-22T10:18:27+5:302024-04-22T10:19:04+5:30

मनसे पदाधिकाऱ्यांची काळजी घेण्याची आणि त्यांना मानसन्मान देण्याची ग्वाही मंत्री भुमरे यांनी दिली,

Loksabha Election 2024 - we MNS will do the work; MNS leader Bala Nandgaonkar's demand | तुम्ही आधी रसद पुरवा, आम्ही मनसे काम करू; मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी

तुम्ही आधी रसद पुरवा, आम्ही मनसे काम करू; मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसेचे कार्यकर्ते तन आणि मनाने तुमचे काम करतील, तुम्ही फक्त रसद पुरवा, अशी साद मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महायुतीला घातली.

शहरातील आयएमए हॉल येथे शनिवारी मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, मनसेचे संपर्क नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, दिलीप बनकर पाटील, दिलीप चितलांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी गळ्यात मनसेचे गमछे घातले होते.

नांदगावकर म्हणाले की, या निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान मिळावा, पक्षप्रमुखांचे छायाचित्र प्रचार रॅलीत असावे. मनसे १८ वर्षांपासून सत्तेत नाही. पक्षाचे कार्यकर्ते तन आणि मनाने तुमचे काम करतील, तुम्ही त्यांना धन द्या, अशी मागणीच त्यांनी उपस्थित महायुतीच्या नेत्यांकडे केली. यावर मनसे पदाधिकाऱ्यांची काळजी घेण्याची आणि त्यांना मानसन्मान देण्याची ग्वाही मंत्री भुमरे यांनी दिली, तर आ. शिरसाट यांनी मनसे आणि शिंदेसेनेचे एकच कुळ असल्याचे सांगितले.

मनसेला हव्या होत्या चार जागा
मनसेने महायुतीकडे चार जागांची मागणी केली होती. नंतर तीन जागांवर आम्ही आलो, परंतु ते एकच जागा देण्यास तयार झाले. शिवाय कमळ चिन्हावर निवडणूक लढा, असा आग्रह धरण्यात आला. त्यामुळे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचे नांदगावकर यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Loksabha Election 2024 - we MNS will do the work; MNS leader Bala Nandgaonkar's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.