छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या अडचणी वाढल्या; विनोद पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 04:57 PM2024-04-21T16:57:44+5:302024-04-21T16:58:08+5:30

 औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदे गट शिवसेनेला मिळाली असून शिवसेनेने आज जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित केली.

lok sabha election 2024 Maratha protester Vinod Patil will contest from Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या अडचणी वाढल्या; विनोद पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या अडचणी वाढल्या; विनोद पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम

 औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदे गट शिवसेनेला मिळाली असून शिवसेनेने आज जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित केली. भुमरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमधील रस्सीखेच संपली. पण, आता महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे.  मराठा आंदोलक नेते विनोद पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

पेच सुटला! अखेर औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी

संदिपान भुमरे यांना यांमा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उमेदवारीची मागणी केली आहे. मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे.

"छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीकडून आताच उमेदवारी जाहीर झाली. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती मला उमेदवारी द्यायची. पण मला कल्पना आहे त्यांच्या पक्षातील दोन आमदार आणि एक राज्यसभेचे खासदार यांनी माझ्या उमेदवारीला विरोध केला. काल केला त्यांनाच माहिती, असंही विनोद पाटील म्हणाले. 

"छत्रपती संभाजीनगरमधील जनतेने ज्यावेळी आग्र्याची शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने मला आग्रह धरला की विकासासाठी निवडणूक लढली पाहिजे. या मतावर मी आज ठाम आहे, मी पुन्हा एकदा जनतेत जाईन आणि जो निर्णय होईल तो कळवेन. पण एवढ मात्र निश्चित आहे मी कालही सांगत होतो आणि आजही सांगतो छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या विजयाच गणित माझ्याकडे आहे, असंही विनोद पाटील म्हणाले. 

औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप कडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता. भाजपकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड मागील दोन वर्षापासून तयारी करीत होते. तर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे देखील शिवसेनेत बंड झाल्यापासून लोकसभेच्या तयारीला लागले होते. हा मतदारसंघ मिळावा, यासाठी भाजपने दोन वर्षात पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा घेतल्या होत्या. मात्र शिंदेसेनेकडून औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला जोरकसपणे लढविला. यामुळे आज अखेर भाजपने शिंदेसेनेला औरंगाबाद मतदारसंघ देऊन टाकला. यानंतर शिंदेसेनेने शनिवारी सायंकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित केली. 

Web Title: lok sabha election 2024 Maratha protester Vinod Patil will contest from Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.