Vinod Mehra Death Anniversary : विनोद मेहरा आईला समजावतं राहिले आणि ‘ती’ डबडबलेल्या डोळ्यांनी निघून गेली ती कायमची...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 08:00 AM2021-10-30T08:00:00+5:302021-10-30T08:00:02+5:30

Vinod Mehra Death Anniversary : १९९० मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे ३० ऑक्टोबरला विनोद मेहरा यांनी जगाचा निरोप घेतला होता.

Vinod Mehra Death Anniversary unknown facts About vinod mehra love story with rekha | Vinod Mehra Death Anniversary : विनोद मेहरा आईला समजावतं राहिले आणि ‘ती’ डबडबलेल्या डोळ्यांनी निघून गेली ती कायमची...!

Vinod Mehra Death Anniversary : विनोद मेहरा आईला समजावतं राहिले आणि ‘ती’ डबडबलेल्या डोळ्यांनी निघून गेली ती कायमची...!

googlenewsNext

सहजसुंदर अभिनय, बोलके डोळे आणि समोरच्याला क्षणात जिंकून घेईल अशा हास्यानं लाखो प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे विनोद मेहरा (Vinod Mehra). बॉलिवूडमध्ये ७० व ८० च्या दशकांत विनोद मेहरा यांनी सर्वांना वेड लावलं होतं. त्या काळातील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून ओळखले जाणारे विनोद मेहरा आज आपल्यात नाहीत. १९९० मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे ३० ऑक्टोबरला (Vinod Mehra Death Anniversary ) विनोद मेहरा यांनी जगाचा निरोप घेतला होता. १३ फेब्रुवारी १९४५ मध्ये जन्मलेल्या विनोद मेहरा यांची अभिनयाची कारकिर्द आणि व्यक्तिगत आयुष्य दोन्ही प्रचंड गाजलं. अभिनेत्री रेखासोबतच्या (Rekha) गुपचूप लग्नाचा त्यांच्या आयुष्यातील एक एपिसोड तर मोठ्या चर्चेचा  विषय ठरला होता.  

विनोद मेहरा यांची बहीण शारदा चित्रपटांत सहअभिनेत्रींच्या भूमिका करायची. तिच्यामुळेच  ‘रागिणी’या चित्रपटात विनोद मेहरा यांना किशोर कुमार यांच्या लहानपणीची भूमिका मिळाली होती. यावेळी ते केवळ 13 वर्षांचे होते. पुढे  बेवकूफ आणि  अंगुलीमाल  या चित्रपटातही विनोद मेहरा बालकलाकार म्हणून दिसले होते. पण असं असलं तरी अ‍ॅक्टिंगमध्ये विनोद मेहरा यांना फार रस नव्हता.

1965 मध्ये विनोद मेहरांनी एका मोठ्या प्रायव्हेट कंपनीत मार्केटींगची नोकरी पत्करली. याचवर्षी   यूनायटेड प्रोड्यूसर्स फिल्मफेयर टॅलेंट हंट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. काही मित्रांनी विनोद मेहरा यांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार केलं. ही स्पर्धा जिंकणाºयासाठी मॉडेलिंग आणि बॉलिवूडचे दरवाजे उघडले जाणार होते. साहजिकच स्पर्धा चुरसीची होती.  मित्रांच्या आग्रहावरून विनोद मेहरा या स्पर्धेत सहभागी झालेत. एकापेक्षा एक स्मार्ट, डॅशिंग, हँडसम तरूणांना मागे टाकत विनोद मेहरा ही स्पर्धा जिंकणार तोच अंतिम फेरित दुसºयाच एका स्पर्धकाने बाजी मारली आणि विनोद मेहरा यांना दुस-या स्थानावर समाधान मानावं लागंलं. विनोद मेहरा यांना मात देणा-या या स्पर्धकाचं नाव होतं राजेश खन्ना. होय, राजेश खन्ना यांनी टॅलेंट हंट स्पर्धा जिंकली आणि पुढे ते बॉलिवूडचे सुपरस्टार बनले. चित्रपटात येण्यापूर्वी विनोद मेहरा मार्केटींग एक्झिक्युटीव्ह होते. एकेदिवशी रेस्टॉरंटमध्ये निर्माता शौरी यांची नजर त्यांच्यावर गेली. त्यांनी आपल्या ‘एक थी रिता’ या चित्रपटासाठी विनोद मेहरा यांना आॅफर दिली. या चित्रपटात त्यांची हिरोईन होती,अभिनेत्री तनुजा.  यानंतर विनोद मेहरा यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

विनोद मेहरांच्या करिअरची गाडी सूसाट पळत असताना इकडे त्यांच्या आईला त्यांच्या लग्नाची चिंता सतावू लागली. विनोद आईचा शब्द टाळत नसतं. आईच्या इच्छेखातर विनोद यांनी मीना ब्रोका हिच्यासोबत लग्न केलं. याचदरम्यान चोर पावलांनी आलेल्या हृदयरोगाने त्यांना ग्रासलं होतं. लग्नानंतर काहीच दिवसांत विनोद यांना हृदयविकाराचा पहिला धक्का आला. यातून ते थोडक्यात बचावले. 

 विनोद मेहरा विवाहित होते, पण असे असतानाही अभिनेत्री बिंदिया गोस्वामी हिच्यावर विनोद मेहरांचा जीव जडला. मग काय, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच विनोद मेहरा यांनी बिंदियासोबत लग्न केलं. पण काहीच वर्षांत  बिंदियाने  अचानक दिग्दर्शक जेपी दत्तासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि विनोद मेहरा यांना घटस्फोट दिला.

बिंदियाला घटस्फोट दिल्यानंतर एकाकी पडलेले विनोद मेहरा अभिनेत्री रेखाच्या जवळ आले.  रेखासोबतचा विनोद मेहरा यांचा रोमान्स त्यावेळी प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. दोघांची गुपचूप लग्न केल्याची चर्चा  त्यावेळी होती. अर्थात रेखा वा विनोद मेहरा यांनी कधीच याची कबुली दिली नाही.  यासिर उस्मान यांच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार, रेखा विनोद मेहरा यांच्याशी लग्न करून सासरी आल्या त्यावेळी त्यांच्या सासूने त्यांना मारण्यासाठी चप्पल हातात घेतली होती. इतकेच नाही तर त्यांना घराबाहेर  हाकलवून लावले होते. रेखा यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या तेथून  निघून गेल्या.  विनोद मात्र तिथेच आपल्या आईला समजवत राहिले. 

आईच्या म्हणण्यावरून विनोद मेहरांनी रेखासोबतचे नातं तोडत तिसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला.  १९८८ मध्ये त्यांनी किरणसोबत लग्न केलं.  किरणपासून विनोद मेहरा यांना रोहन आणि सोनिया अशी दोन मुलं झालीत. पण या लग्नानंतर दोनच वर्षांत विनोद मेहरा यांनी  ३० आॅक्टोबर १९९० रोजी जगाचा निरोप घेतला.

 

Web Title: Vinod Mehra Death Anniversary unknown facts About vinod mehra love story with rekha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.