Salman Khan Snake Bite : 'एकदा नाही, तर तीन वेळा सापाने दंश केला', खुद्द सलमान खाननं सांगितलं नक्की काय घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 08:11 AM2021-12-27T08:11:23+5:302021-12-27T08:12:17+5:30

Snake Bites Salman Khan: सलमान खाननं सर्पदंशाबद्दल सांगताना सापानं एकदा नाही, तर तीन वेळा दंश केल्याचं म्हटलं.

salman khan reveals snake bites him three times salman khan tells the whole incident | Salman Khan Snake Bite : 'एकदा नाही, तर तीन वेळा सापाने दंश केला', खुद्द सलमान खाननं सांगितलं नक्की काय घडलं...

Salman Khan Snake Bite : 'एकदा नाही, तर तीन वेळा सापाने दंश केला', खुद्द सलमान खाननं सांगितलं नक्की काय घडलं...

Next

Snake Bites Salman Khan: अभिनेता सलमान खानला सर्पदंश झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी रात्री घडली. पनवेल कामोठे येथील एमजीएम मध्ये दाखल करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील वाजेपूर याठिकाणी सलमान खानचे अर्पिता फार्म (Arpita Farm) म्हणून फार्म हाऊस आहे. याठिकाणी ही घटना घडली. साप बिनविषारी असल्याने प्राथमिक उपचार करून सलमान खानला एमजीएममधून सोडून देण्यात आले. दरम्यान त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती खुद्द सलमान खाननं (Salman Khan) दिली आहे. सलमान खानच्या वाढदिवसापूर्वीच (Salman Khan Birthdy) ही घटना घडली होती.

"फार्म हाऊसच्या एका रुममध्ये साप शिरला होता. अशा परिस्थितीत मुलं घाबरली. मी सापाला बाहेर काढण्यासाठी त्या खोलीत गेलो. मी एक काठी मागितली, पण ती खुप छोटी होती. अशातच मी मोठी काठी मागितली आणि त्याच्या सहाय्यानं सापाला उचलून बाहेर आणलं. साप हळहळू माझ्या हाताच्या दिशेने आला. मी सापाला सोडण्यासाठी ती काठी दुसऱ्या हातात घेतली आणि त्याला बाहेर सोडलं," असं सलमाननं सांगितलं.

तीन वेळा दंश
"त्या ठिकाणी असलेल्या लोकांना आणि गावकऱ्यांना तो कोणत्या प्रकारचा साप आहे याची कल्पना होती. परंतु त्या ठिकाणी सुरू असलेल्या गोंगाटादरम्यान, त्या सापानं मला तीन वेळा दंश केला. यानंतर आम्ही त्या ठिकाणाहून रुग्णालयात गेलो. त्या ठिकाणी मला अँटी वेनम इंजेक्शन दिलं. आतापर्यंत मी सर्व प्रकारची अँटी वेनम इंजक्शन्स घेतली आहेत," असंही त्यानं सांगितलं. "सर्पदंशानंतर माझी बहीण घाबरली होती. तोपर्यंत माझी आणि सापाची मैत्री झाली. अशात सापाची आणि माझी मैत्री झाली. त्याच्यासोबत मी सेल्फी काढला आणि त्याला सोडून दिलं," असं ते हसत म्हणाला.


 
रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल
सर्पदंशानंतर सलमानला पनवेल कामोठे येथील एमजीएम मध्ये दाखल करण्यात आले होते. साप बिनविषारी असल्याने प्राथमिक उपचार करून सलमान खानला एमजीएममधून सोडून देण्यात आले. सलमान खान नेहमीच त्याचा वाढदिवस अथवा इतर घरगुती कार्यक्रम पनवेल येथील अर्पिता फार्मवर साजरा करीत असतो. यावेळी देखील ख्रिसमस, नववर्षाच्या सेलिब्रशनासाठी सलमान पनवेलमध्ये दाखल झाला होता. या परिसराच्या नजीक जंगल असल्याने याठिकाणी वन्यजीव मोठ्या प्रमाणात आढळतात.

Web Title: salman khan reveals snake bites him three times salman khan tells the whole incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app