'ही' मराठी अभिनेत्री चढली बोहल्यावर, पाहा लग्नाचे Inside Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 02:57 PM2021-11-03T14:57:35+5:302021-11-03T14:58:01+5:30

नववधू रसिकाचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये रसिकांचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे.

Rasika Sunil And Aditya Bilagi Wedding Inside Photo Viral | 'ही' मराठी अभिनेत्री चढली बोहल्यावर, पाहा लग्नाचे Inside Photo

'ही' मराठी अभिनेत्री चढली बोहल्यावर, पाहा लग्नाचे Inside Photo

googlenewsNext

सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा सनईचे सूर ऐकायला मिळाले. आपल्या आवडत्या कलाकाराच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी रसिक फार उत्सुक असतात. त्यांच्या जीवनातील प्रत्येक घडामोडींवर रसिकांचं बारीक लक्ष असते. विशेषतः त्यांचं अफेअर आणि लग्न याबाबत जाणून घेण्याची रसिकांना विशेष उत्सुकता असते. त्यांच्या लग्नाची बातमी रसिकांना आनंदितही करते तर काही डायहार्ट रसिकांचा हिरमोडसुद्धा. अशीच एका कलाकाराच्या लग्नाची बातमी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 

ही बातमी आहे माझ्या नव-याची बायको फेम शनाया म्हणजेच रसिकां सुनिल हिच्या लग्नाची. रसिका सुनिल नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. रसिकाच्या लग्नाचे फोटो पाहून सोशल मीडियावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आदित्य बिलागीसोबत ती लग्नबंधात अडकली आहे. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. गोव्याच्या समुद्राकाठी या दोघांचे लग्न पार पडले.  नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती  शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.

समोर आलेल्या या फोटोंमध्ये रसिकाचा लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नववधू रसिकाचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये रसिकांचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. तर आदित्यनेही रसिकाच्या साडीला मिळता जुळता असा पेहराव केला आहे. रसिका आणि आदित्य दोघांमध्येही चांगलीच केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते.

छोट्या पडद्यावरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रचंड गाजली होती. मालिकेत रसिका सुनिलने शनायाही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिका बंद झाली असली तरी आजही शनायाला रसिक विसरलेले नाहीत. सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत शनायाला चाहते फॉलो करतात.

Web Title: Rasika Sunil And Aditya Bilagi Wedding Inside Photo Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.