Shilpa Shetty ने राज कुंद्रासोबत का केलं लग्न? अनिल कपूरने दिलं हैराण करणारं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 12:36 PM2021-11-03T12:36:24+5:302021-11-03T12:36:47+5:30

अनिक कपूरचं (Anil Kapoor) हे उत्तर ऐकताच शिल्पा (Shilpa Shetty) जोरात हसते  आणि म्हणते की, 'पैशांसोबत त्याने हातही पसरवले होते'. ज्यावर अनिल कपूर म्हणाले की, 'हातांमध्ये पैसे  होते'.

Farah Khan asked why Shilpa Shetty got married with Raj Kundra Anil Kapoor gave epic answer | Shilpa Shetty ने राज कुंद्रासोबत का केलं लग्न? अनिल कपूरने दिलं हैराण करणारं उत्तर

Shilpa Shetty ने राज कुंद्रासोबत का केलं लग्न? अनिल कपूरने दिलं हैराण करणारं उत्तर

Next

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) च्या आयुष्यात आता काही दिवसांपूर्वीच मोठं वादळ आलं होतं. पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी केसमध्ये अटक झाली होती. नुकतंच राज कुंद्राने स्वत:ला सोशल मीडियापासून दूर केलं आहे. या दरम्यान शिल्पाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हिडीओत फराह खान (Farah Khan) तिला विचारताना दिसत आहे की, तू राजसोबत लग्न का केलं होतं?

जुना व्हिडीओ झाला व्हायरल

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चे खूप व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. शिल्पा शेट्टी बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जिच्याबाबत जाणून घेण्यासाठी लोक सर्वात जास्त एक्सायटेड राहतात. अशात शिल्पाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हसण्यावर कंट्रोल ठेवू शकत नाहीयेत. या व्हिडीओत शिल्पा शेट्टीसोबत अनिल कपूर दिसत आहे. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे जेव्हा शिल्पा आणि अनिक कपूर (Anil Kapoor) फराह खानच्या शोमध्ये गेस्ट म्हणून गेले होते.

अनिल कपूरने दिलं उत्तर

व्हिडीओत फराह खान (Farah Khan) शिल्पाला प्रश्न विचारते, ज्याचं उत्तर अनिल कपूर देतो. फराह शिल्पाला विचारते की, 'राजने अशी कोणती शिटी वाजवली होती, पंख पसरले होते, काय केलं होतं जे तू त्याच्यासोबत लग्न केलं?'. यावर अनिक कपूर पटकन म्हणाले की, 'पैसे पसरवले होते'. अनिक कपूरचं हे उत्तर ऐकताच शिल्पा जोरात हसते  आणि म्हणते की, 'पैशांसोबत त्याने हातही पसरवले होते'. ज्यावर अनिल कपूर म्हणाले की, 'हातांमध्ये पैसे  होते'.

फराह खान अनिल कपूरला मजेदार प्रश्न

यानंतर फराहने अनिल कपूरला विचारलं की, 'तुमच्याकडे तर पैसे नव्हते मग सुनीत कशी पटली?'. अनिल कपूरने यावर उत्तर दिलं की, 'कारण सुनीताकडे पैसे होते'. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोकांना खासकरून अनिक कपूरचा ह्यूमर अधिक आवडला आहे.
 

Web Title: Farah Khan asked why Shilpa Shetty got married with Raj Kundra Anil Kapoor gave epic answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app