lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > रिलायन्सला मागे टाकत HDFC Bank बनली बाजारचा नवा 'बाहुबली', जाणून घ्या कुठवर जाणार शेअरची किंमत?

रिलायन्सला मागे टाकत HDFC Bank बनली बाजारचा नवा 'बाहुबली', जाणून घ्या कुठवर जाणार शेअरची किंमत?

सोमवारच्या बंद भावाचा विचार करता, रिलायन्सचे मार्केट कॅप 18.5 लाख कोटी रुपये एवढे आहे. तर एचडीएफसी 9.26 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 06:30 PM2023-07-11T18:30:32+5:302023-07-11T18:31:23+5:30

सोमवारच्या बंद भावाचा विचार करता, रिलायन्सचे मार्केट कॅप 18.5 लाख कोटी रुपये एवढे आहे. तर एचडीएफसी 9.26 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

HDFC Bank became the new Baahubali of the nifty market, surpassing Reliance, know where the share price will go | रिलायन्सला मागे टाकत HDFC Bank बनली बाजारचा नवा 'बाहुबली', जाणून घ्या कुठवर जाणार शेअरची किंमत?

रिलायन्सला मागे टाकत HDFC Bank बनली बाजारचा नवा 'बाहुबली', जाणून घ्या कुठवर जाणार शेअरची किंमत?

HDFC बँक आणि HDFC च्या रिव्हर्स मर्जरनंतर, HDFC बँक निफ्टीची नवीन बाहुबली बनली आहे. निर्देशांकातील बँकेचे वजन मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षाही अधिक झाले आहे. एचडीएफसीच्या शेअर्सची ट्रेडिंग 13 जुलैपासून स्टॉक एक्सचेन्जमध्ये बंद होईल. मर्जरनंतर एचडीएफसी बँकेचे वेटेज वाढून 14.43 टक्क्यांवर पोहोचेल. आता निफ्टीवर रिलायनसचे वेटेज 10.9 टक्के आहे, जे कमी होऊन 10.8 टक्के होईल. सोमवारच्या बंद भावाचा विचार करता, रिलायन्सचे मार्केट कॅप 18.5 लाख कोटी रुपये एवढे आहे. तर एचडीएफसी 9.26 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मर्जरनंतर एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप वाढेल.

रिलायन्स प्रमाणेच एचडीएफसी बँकेत कुणीही प्रमोटर नाही. यामुळेच सर्व लिस्टेड शेअर्समध्ये तिचा फ्री फ्लोट सर्वाधिक आहे. एनएसईचे इंडेक्स वेटेज मोजण्यासाठी फ्री फ्लोट मार्केट कॅप मेथडचा वापर केला जातो. अर्थात ज्या स्टॉक्सचे फ्री फ्लोट सर्वाधिक आहे, त्यांचे वेटेज तेवढेच अधिक असेल. निफ्टी बँक इंडेक्समध्येही एचडीएफसी बँकेचे वेटेज 26.9 टक्क्यांनी वाढून 29.1 टक्क्यांवर पोहोचेल. आयसीआयसीआय बँकेचे वेटेज 23.3 टक्क्यांनी घसरून 24.4 टक्के राहील. निफ्टीत एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे एकूण वेटेज 52.4 टक्के असेल. बँकिंग इंडेक्समध्ये एसबीआय, कोटक महिंद्रा बँक आणि अॅक्सिस बँकेचे वेटेज कमी होईल. निफ्टी-50 मध्येही आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, आयटीसी आणि टीसीएसचे वेटेज कमी होईल. निफ्टीमध्ये एचडीएफसीची जागा एलटीआयमाइंडट्री घेईल.

53.31 पट झाला होता सब्सक्राइब -
एचडीएफसी बँकेची दलाल स्ट्रीटमध्ये जबरदस्त सुरूवात झाली होती. 14 मार्च, 1995 रोजी कंपनीचा आयपीओ आला होता. तेवा तो 53.31 पट सब्सक्राइब झाला होता. तेव्हापासून तो गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पैसा बनवणाऱ्या शेअर्समध्ये राहिला आहे. गेल्या तीन महिन्यांत या स्टॉकने फ्लॅट परतावा दिला असून सोमवारी बीएसईवर 1,656.30 रुपयांवर बंद झाला. मोर्गन स्टेनलीच्या मते, या शेअरचे टार्गेट प्राइस 2,110 रुपयांपर्यंत आहे. रिलायन्सचा शेअरही ऑल टाइम हाच कडे कूच करत आहे. मंगळवारी हा शेअर 2,764.50 रुपयांपर्यंत गेला होता. या शेअरचा ऑल टाइम हाय 2,856.15 रुपये एवढा आहे. गत वर्षी 29 एप्रिलला हा शेअर या लेव्हलवर पोहोचला होता.

Web Title: HDFC Bank became the new Baahubali of the nifty market, surpassing Reliance, know where the share price will go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.