lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 12 डिसेंबरपासून पोस्ट ऑफिसचा नवा नियम, उद्याच 'हे' काम करा अन्यथा भरावे लागेल अतिरिक्त शुल्क

12 डिसेंबरपासून पोस्ट ऑफिसचा नवा नियम, उद्याच 'हे' काम करा अन्यथा भरावे लागेल अतिरिक्त शुल्क

post office : इंडिया पोस्टने(India Post) ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 03:20 PM2020-12-10T15:20:05+5:302020-12-10T15:20:36+5:30

post office : इंडिया पोस्टने(India Post) ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

post office savings account new rule applicable from 12 december 2020 | 12 डिसेंबरपासून पोस्ट ऑफिसचा नवा नियम, उद्याच 'हे' काम करा अन्यथा भरावे लागेल अतिरिक्त शुल्क

12 डिसेंबरपासून पोस्ट ऑफिसचा नवा नियम, उद्याच 'हे' काम करा अन्यथा भरावे लागेल अतिरिक्त शुल्क

Highlights12 डिसेंबरला ग्राहकांच्या खात्यात किमान बॅलन्स नसेल तर देखभाल शुल्क (Maintenance Charges) द्यावे लागणार आहे.

नवी दिल्ली : जर तुमचे सुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर तुम्हाला आता हे नवीन नियम माहीत असणे आवश्यक आहे. 12 डिसेंबर 2020 पासून पोस्ट ऑफिसच्या नियमामध्ये बदल होणार आहेत. नव्या नियमानुसार, 11 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना पोस्ट ऑफिस बचत खात्यात (Post Office Savings Account) किमान 500 रुपये  शिल्लक (बॅलन्स) ठेवणे आवश्यक आहे. 12 डिसेंबरला ग्राहकांच्या खात्यात किमान बॅलन्स नसेल तर देखभाल शुल्क (Maintenance Charges) द्यावे लागणार आहे.

India Post कडून ट्विट
इंडिया पोस्टने(India Post) ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. इंडिया पोस्टने एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आता पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यात किमान बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे.

बॅलन्स न ठेवल्यास इतका लागेल चार्ज
इंडिया पोस्टने माहिती देताना म्हटले आहे की, 11 डिसेंबर 2020 नंतर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर लागू होणारी देखभाल फी टाळण्यासाठी आपल्या खात्यात लवकरच किमान 500 रुपयांचा बॅलन्स निश्चित करा. अन्यथा आर्थिक वर्षाच्या अखेरीस देखभालच्या नावाखाली खात्यातून 100 रुपये वजा केले जातील.
इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार पोस्ट ऑफिस बचत खात्यावर वार्षिक व्याज दर 4 टक्के आहे. व्याज कमीतकमी बॅलन्स रकमेच्या आधारे महिन्याच्या 10 व्या आणि महिन्याच्या शेवटी कॅलक्युलेशन केले जाते. ग्राहक जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून त्यांच्या सोयीनुसार ते खाते उघडू शकतात.

पोस्ट ऑफिसमध्ये कोण खाते उघडू शकते?
पोस्ट ऑफिस बचत खाते एकट्या प्रौढ व्यक्तीद्वारे किंवा संयुक्तपणे दोन प्रौढ व्यक्तीद्वारे (संयुक्त खाते) किंवा अल्पवयीन मुलांद्वारे पालकांच्यावतीने उघडता येते. 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाने खाते उघडले जाऊ शकते. एका व्यक्तीद्वारे केवळ एक पोस्ट ऑफिस बचत खाते उघडता येते. पोस्ट ऑफिस बचत खाते उघडताना नॉमिनीची आवश्यकता असते.

'या' सुविधा मिळतात...
-  पोस्ट ऑफिस बचत खात्यावर ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात.
- खात्यावर चेक / एटीएम सुविधा
- नॉमिनेशनची सुविधा
- एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करण्याची सुविधा
-  नेट बँकिंग / मोबाइल बँकिंग सुविधा
-  ऑनलाईन फंड ट्रान्सफर करण्याची सुविधा
 

Web Title: post office savings account new rule applicable from 12 december 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.