lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम

'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम

कर्मचाऱ्यांसाठी असा निर्णय घेणारी आरपीजी एंटरप्राइजेस ही भारतातील पहिली कंपनी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 02:29 PM2020-08-31T14:29:28+5:302020-08-31T14:36:16+5:30

कर्मचाऱ्यांसाठी असा निर्णय घेणारी आरपीजी एंटरप्राइजेस ही भारतातील पहिली कंपनी आहे.

it health energy sector company allows all sales employees to do work from home permanently | 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम

'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम

Highlightsकंपनीने आपल्या सेल्स कर्मचार्‍यांना घरातून कायमस्वरूपी काम (Permanent Work From Home) करण्याची परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली : कोरोना संकटकाळात अनेक कंपन्यांनी कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची सुविधा दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गुगल आणि फेसबुकने तर जून २०२१ पर्यंत आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. यातच भारतातील कंपनी आरपीजी एंटरप्राइजेसने (RPG Enterprise) मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या सेल्स कर्मचार्‍यांना घरातून कायमस्वरूपी काम (Permanent Work From Home) करण्याची परवानगी दिली आहे. कर्मचाऱ्यांसाठी असा निर्णय घेणारी आरपीजी एंटरप्राइजेस ही भारतातील पहिली कंपनी आहे.

७५ टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी
इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरपीजी एंटरप्राइजेस टायर, आयटी, हेल्थ, एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लांटेशन क्षेत्रात व्यवसाय करत आहे. कंपनीने वर्क फ्रॉम होम विषयी नवीन धोरण तयार केले आहे. याअंतर्गत कंपनीचे कर्मचारी घरातून कायमचे काम करतील, तर इतर कर्मचार्‍यांपैकी ७५ टक्के कर्मचाऱ्यांनाही घरून काम करण्याची मुभा दिली जाणार असल्याची शक्यता आहे. विशेष प्रकरणात कार्यालयात काम करणाऱ्या ७५ टक्के कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

नवीन पॉलिसी १ सप्टेंबरपासून सुरु होईल
कार्यालयात काम करणारे कर्मचारी महिन्यातून दोन आठवडे घराबाहेर काम करू शकतात. तसेच, विशेष प्रकरणांमध्ये त्यांना तीन आठवड्यांपर्यंत घरून काम करण्याची परवानगी मिळू शकते. सध्या कंपनीच्या कार्यालयात काम करणारे सर्व कर्मचारी घरून काम करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीची सर्व कार्यालये बंद केली आहेत. कंपनीचे नवीन धोरण १ सप्टेंबरपासून अंमलात येईल. हे धोरण आरपीजीच्या ग्लोबल ऑपरेशन्सवर देखील लागू होईल. तसेच, फॅक्टरी आणि प्लांटेशनमध्ये मशीनवर काम करत नसलेल्या कामगारांनाही हे धोरण लागू असेल.

WFH मुळे जीवनमान सुधारेल
वर्क फ्रॉम होम पॉलिसीने काम करण्याची पारंपारिक धारणा मोडली आहे. जे कर्मचारी मशीनवर काम करत नाहीत आणि ज्यांना तंत्रज्ञान व्यवसायात क्लायंटला भेटण्याची जबाबदारी नाही, ते कोरोना कालावधीनंतरही कोठूनही काम करू शकतात, असे आरपीजी एंटरप्राइजेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी म्हटले आहे. याचबरोबर, कर्मचार्‍यांना काम करण्याचे नवीन मार्ग अवलंबण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आणि उत्पादकता वाढेल, असे आरपीजी एंटरप्राइजेसने जगभरातील आपल्या कंपन्यांच्या ३० हजार कर्मचार्‍यांना पाठवलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे.

आणखी बातम्या...

- सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता    

- आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो 

- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...  

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

-  धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

Web Title: it health energy sector company allows all sales employees to do work from home permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.