Post Office Schemes: भारतीय पोस्ट ऑफिस केवळ टपाल सेवाच नाही, तर अनेक प्रकारच्या बँकिंग सेवा देखील देतं. पोस्ट ऑफिसमध्ये साध्या बचत खात्यासोबतच आरडी खातं, एफडी खातं, किसान विकास पत्र, मंथली इनकम स्कीम यांसारख्या सर्व बचत योजनांमध्ये खातं उघडता येतं. एफडीबद्दल बोलायचं झालं तर, पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पोस्ट ऑफिसमधील एफडी खात्यांवर बँकांच्या तुलनेत जास्त व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत १ लाख रुपये जमा केल्यास किती परतावा मिळेल, हे आपण येथे जाणून घेणार आहोत.
एफडी खात्यांवर ७.५ टक्क्यांपर्यंत बंपर व्याज
पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत १ लाख रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल, हे तुम्ही किती कालावधीसाठी खाते उघडत आहात यावर अवलंबून आहे. पोस्ट ऑफिस १ वर्षाच्या एफडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या एफडीवर ७.० टक्के, ३ वर्षांच्या एफडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज देत आहे. याशिवाय, तुम्हाला एका खास गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की पोस्ट ऑफिसमध्ये एफडी खाती टीडी (Time Deposit) नावानं उघडली जातात. पोस्ट ऑफिसचे टीडी खातं अगदी बँकांच्या एफडी खात्यासारखेच असतं, ज्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर निश्चित व्याजासह संपूर्ण पैसे परत मिळतात.
शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरुच; Sensex १५० अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी स्वाहा
१,००,००० रुपये जमा केल्यास किती परतावा?
जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्षाच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,०७,०८१ रुपये मिळतील, ज्यामध्ये ७,०८१ रुपयांच्या परताव्याचा समावेश आहे. जर तुम्ही २ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,१४,८८८ रुपये मिळतील, ज्यामध्ये १४,८८८ रुपयांच्या परताव्याचा समावेश आहे.
तसंच, जर तुम्ही ३ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,२३,५०८ रुपये मिळतील, ज्यामध्ये २३,५०८ रुपयांचा परतावा समाविष्ट आहे आणि जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,४४,९९५ रुपये मिळतील, ज्यामध्ये ४४,९९५ रुपयांच्या परताव्याचा समावेश आहे.
