lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशभरात 5000 EV चार्जिंग स्टेशनची उभारणी; Tata ने HPCL सोबत केला मोठा करार...

देशभरात 5000 EV चार्जिंग स्टेशनची उभारणी; Tata ने HPCL सोबत केला मोठा करार...

EV Charging Station: मागील काही वर्षांपासून देशात EV वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 06:47 PM2024-03-27T18:47:57+5:302024-03-27T18:49:31+5:30

EV Charging Station: मागील काही वर्षांपासून देशात EV वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

EV Charging Station: Construction of 5000 EV Charging Stations across the country; Tata signs big deal with HPCL | देशभरात 5000 EV चार्जिंग स्टेशनची उभारणी; Tata ने HPCL सोबत केला मोठा करार...

देशभरात 5000 EV चार्जिंग स्टेशनची उभारणी; Tata ने HPCL सोबत केला मोठा करार...

Public EV Charging Station: गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या या क्षेत्रात येत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसोबतच चार्जिंग पायाभूत सुविधा वाढवणे तितकेच महत्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीने, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत या वर्षाच्या अखेरीस देशभरात 5,000 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी हातमिळवणी केली आहे. 

टाटा मोटर्सची कंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (TPEM) ने बुधवारी एका निवेदनात म्हटले की, या भागीदारी अंतर्गत HPCL पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारले जातील. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, या दोन्ही संस्थांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. विशेष म्हणजे, HPCL चे देशभरात 21,500 पेक्षा जास्त पेट्रोल पंप आहेत. डिसेंबर 2024 पर्यंत यात 5000 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स बसवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

TPEM च्या बालाजी राजन यांनी सांगितले की, HPCL सोबतची ही धोरणात्मक भागीदारी भारताच्या EV इकोसिस्टमला पुढे नेण्याची आमची वचनबद्धता दर्शवते. इलेक्ट्रिक वाहनांचा ग्राहक वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक आहे. यात चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर जास्त महत्त्वाचे आहे.  दरम्यान, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी भारतात इलेक्ट्रिक कार विकण्यात आघाडीवर आहे. भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये कंपनीचा हिस्सा 70% पेक्षा जास्त आहे. 

सध्या कंपनीच्या EV पोर्टफोलिओमध्ये Nexon EV, Punch EV, Tigor EV आणि Tiago EV यांचा समावेश आहे. कंपनी आगामी काळात आणखी अनेक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचा विचार करत आहे. Tata Harrier चे इलेक्ट्रिक व्हर्जन यावर्षी लॉन्च होऊ शकते. याशिवाय कर्व ईव्हीदेखील लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी चार्जिंग स्टेशन महत्वाचे असतील. त्यामुळेच हा करार करण्यात आला आहे. 

Web Title: EV Charging Station: Construction of 5000 EV Charging Stations across the country; Tata signs big deal with HPCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.