Gold Reserve: गेल्या काही काळात सोनं आणि चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत सोन्याच्या किमतीत २६५ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. या काळात चीन, पोलंड, तुर्की आणि भारतासह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. मात्र, याच काळात काही देशांनी आपला सोन्याचा साठा कमी देखील केला आहे. यामध्ये फिलीपीन्स, कझाकिस्तान, श्रीलंका, जर्मनी, मंगोलिया आणि ताजिकिस्तान या देशांचा प्रामुख्यानं समावेश आहे.
सर्वाधिक सोने खरेदी करणारे देश
२०२० ते २०२५ दरम्यान सर्वाधिक सोने खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत चीन अग्रस्थानी आहे. चीनने गेल्या पाच वर्षांत ३५७.१ टन सोन्याची खरेदी केली आहे, परंतु तज्ज्ञांच्या मते चीननं गुप्तपणे यापेक्षा कितीतरी जास्त सोनं साठवलं आहे. चीननंतर सोन्याची सर्वाधिक खरेदी पोलंडने केली असून या युरोपीय देशाने ३१४.६ टन सोनं विकत घेतलं. त्यानंतर तुर्की (२५१.८ टन) आणि भारत (२४५.३ टन) यांचा क्रमांक लागतो. तसंच ब्राझीलने १०५.१ टन, अझरबैजाननं ८३.६ टन, जपाननं ८०.८ टन, थायलंडने ८०.६ टन, हंगेरीने ७८.५ टन आणि सिंगापूरने ७७.३ टन सोन्याची खरेदी केली.
🟡 Central Bank Gold Reserves. Biggest changes (2020–2025)
— World of Statistics (@stats_feed) February 12, 2026
Most purchased (tonnes added):
1.🇨🇳 China +357.1⁰2.🇵🇱 Poland +314.6⁰3.🇹🇷 Türkiye +251.8⁰4.🇮🇳 India +245.3⁰5.🇧🇷 Brazil +105.1⁰6.🇦🇿 Azerbaijan +83.6⁰7.🇯🇵 Japan +80.8⁰8.🇹🇭 Thailand +80.6⁰9.🇭🇺 Hungary +78.5…
सोन्याची सर्वाधिक विक्री करणारे देश
गेल्या ५ वर्षात सोन्याची सर्वाधिक विक्री करणाऱ्या देशांमध्ये फिलीपीन्स पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी या काळात ६५.२ टन सोनं विकलंय. कझाकिस्ताननं ५२.४ टन सोन्याची विक्री केली असून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेनं १९.१ टन सोनं विकलं. २०२० ते २०२५ या काळात जर्मनीचा सोन्याचा साठा १६.३ टनांनी कमी झाला आहे, तर मंगोलियाने १५.९ टन सोनं विकलं. याशिवाय ताजिकिस्तानने ११.९ टन, युरो एरियाने १०.८ टन, कोलंबियाने ९.२ टन आणि फिनलंडने ५.४ टन सोन्याची विक्री केली आहे.
