Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट

'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट

दोन्ही कंपन्यांना मिळून ११,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे मोठे प्रकल्प मिळाल्यानं गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या, तुमच्याकडेही आहे का हा स्टॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:13 IST2026-05-12T14:13:51+5:302026-05-12T14:13:51+5:30

दोन्ही कंपन्यांना मिळून ११,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे मोठे प्रकल्प मिळाल्यानं गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या, तुमच्याकडेही आहे का हा स्टॉक

Afcons Infrastructure Welspun Enterprises Infra companies won big project Stocks soared after getting a project worth Rs 11000 crore railwayhighway project in hand | 'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट

'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट

Infra Stock Price: मंगळवारी शेअर बाजारात 'अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर' आणि 'एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग' या दोन दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सनी जोरदार कामगिरी केली. या दोन्ही कंपन्यांना मिळून ११,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे मोठे प्रकल्प मिळाल्यानं गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. या ऑर्डरमुळे कंपन्यांच्या आगामी काळातील प्रगतीचे संकेत मिळत असून, अफकॉन्सच्या शेअरमध्ये सुमारे ८ टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली.

अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरची परदेशात मोठी झेप

शापूरजी पल्लोनजी समूहातील 'अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर'साठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. कंपनीची क्रोएशियामधील एका भव्य रेल्वे प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी (L1) म्हणून निवड झाली आहे. या प्रकल्पाचं मूल्य तब्बल ७,५४४ कोटी रुपये आहे. या प्रकल्पाचं स्वरूप पाहायचं झालं तर, क्रोएशियातील 'डुगो सेलो-नोव्स्का' रेल लाईनवर सध्याच्या ट्रॅकची पुनर्रचना करणं आणि नवीन दुसरा ट्रॅक टाकणं हे आहे. यासोबतच इलेक्ट्रिफिकेशन, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनची जबाबदारीही कंपनी सांभाळणार आहे. 

शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?

एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग: महाराष्ट्रात हायवेचं काम

देशांतर्गत बाजारपेठेत 'एचजी इन्फ्रा'नं आपली पकड अधिक घट्ट केली आहे. कंपनीला वेलस्पन एंटरप्रायझेसकडून महाराष्ट्रातील एका हायवे प्रकल्पासाठी लेटर ऑफ अवॉर्ड (LoA) मिळालं आहे. या प्रकल्पाची किंमत ३,९३१ कोटी रुपये आहे.

प्रकल्पाचे स्वरूप: पुणे ते शिरूर (NH-753F) दरम्यान सुमारे ५३.४ किलोमीटर लांबीचा ६-लेन अंशतः एलिव्हेटेड हायवे कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला ३६ महिने म्हणजेच ३ वर्षांचा वेळ देण्यात आला आहे.

शेअर बाजारातील स्थिती

मोठ्या ऑर्डर्सच्या बातमीमुळे गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये जोरदार खरेदी केली. सोमवारी ३२६.३० रुपयांवर बंद झालेला अफकॉन्सचा शेअर मंगळवारी दुपारी १२:३४ वाजेपर्यंत १.७८ टक्क्यांच्या वाढीसह ३३२.४५ रुपयांवर व्यवहार करत होता. तसंच एचजी इन्फ्राचा शेअरही कालच्या ६३० रुपयांच्या पातळीवरून वधारून ६४०.६५ रुपयांवर (१.७३% वाढ) पोहोचला. इन्फ्रा क्षेत्रातील वाढता सरकारी खर्च आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारी कंत्राटं यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या काळात अधिक मजबूती येण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : इन्फ्रा कंपनियों अफकॉन्स, एचजी इन्फ्रा को मिले प्रोजेक्ट, शेयर में उछाल।

Web Summary : अफकॉन्स और एचजी इन्फ्रा को ₹11,000 करोड़ के प्रोजेक्ट मिले, जिससे उनके शेयर की कीमतों में वृद्धि हुई। अफकॉन्स ने क्रोएशियाई रेल परियोजना जीती, जबकि एचजी इन्फ्रा महाराष्ट्र में राजमार्ग बनाएगा। इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्र के और मजबूत होने की उम्मीद है।

Web Title : Infra firms Afcons, HG Infra bag projects, stocks surge.

Web Summary : Afcons and HG Infra secured projects worth ₹11,000 crore, boosting their stock prices. Afcons won a Croatian rail project, while HG Infra will build a highway in Maharashtra. The infrastructural sector is expected to strengthen further.