lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर, विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ नाही, असे आहेत या महिन्याचे दर

खूशखबर, विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ नाही, असे आहेत या महिन्याचे दर

मात्र घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 09:58 AM2020-08-01T09:58:59+5:302020-08-01T10:48:52+5:30

मात्र घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Good news, There is no increase in the price of unsubsidized domestic gas cylinders | खूशखबर, विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ नाही, असे आहेत या महिन्याचे दर

खूशखबर, विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ नाही, असे आहेत या महिन्याचे दर

नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये केंद्र सरकारने या महिन्यासाठी सर्वंसामान्यांना दिलासा दिला आहे. गेल्या दोन महिन्यात झालेल्या वाढीनंतर ऑगस्ट महिन्यामध्येही एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिन्यामध्ये सिलेंडरच्या दरात दिल्लीमध्ये एक रुपयाने तर मुंबईत साडेतीन रुपयांनी वाढ झाली होती. तर जून महिन्यात सिलेंडरचे दर ११.५० रुपयांनी वाढले होते. फेब्रुवारी महि्न्यात दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरचे दर हे ८५८. ५० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जागतिक मागणी कमी झाल्याने हे दर मार्चमध्ये ८०५.५० रुपयांपर्यंत खाली आले. त्यानंतर मे महिन्यात सिलेंडरच्या दरात अजून मोठी कपात होऊन ते ७४४ वरून ५८१.५० पर्यंत घसरले.

आता ऑगस्ट महिन्यातील विनाअनुदानित गॅस सिलेंडरचे दर पुढीलप्रमाणे असतील. दिल्ली ५९४ रुपये, मुंबई ५९४ रुपये, कोलकाता ६२१ रुपये आणि चेन्नई ६१०.५० रुपये एवढे राहतील.  दरम्यान, गेल्या महिन्यातही ग्राहकांना याच किमतीला विनाअनुदानित गॅस सिलेंडर खरेदी करावे लागले होते. 

जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत गरगुती गॅस सिलेंडरच्या विक्रीत १५.७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. सरकारने लॉकडाऊनच्या काळात उज्ज्वला गॅस सिलेंडरधारकांना मोफत सिलेंडर देण्याची घोषणा केल्याने ही वाढ नोंदवली गेली होती. दरम्यान, चेन्नईमध्ये १९ किलो एलपीजी गॅसच्या किमतीत दोन रुपयांनी घट झाली आहे. आता येथे १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत १२५३ रुपये असेल. दिल्लीमध्ये १९ किलो गॅस सिलेंडरसाठी ११३५.५०, कोलकात्यामध्ये ११९८.५० रुपये तर मुंबईत १९ किलो गॅस सिलेंडरसाठी १०९१ रुपये मोजावे लागतील.

इतर महत्त्वाच्या बातम्या

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

Web Title: Good news, There is no increase in the price of unsubsidized domestic gas cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.