lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल-डिझेलच्या किंमती केव्हा कमी होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिलं असं उत्तर 

पेट्रोल-डिझेलच्या किंमती केव्हा कमी होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिलं असं उत्तर 

अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. इंधनाच्या किमती वाढत असतानाच, आता या किमती कमी केव्हा व्हायला लागतील? असा सवाल जनता सरकारला विचारू लागली आहे. (Finance minister Nirmala Sitharaman)

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 10:19 PM2021-02-25T22:19:58+5:302021-02-25T22:22:44+5:30

अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. इंधनाच्या किमती वाढत असतानाच, आता या किमती कमी केव्हा व्हायला लागतील? असा सवाल जनता सरकारला विचारू लागली आहे. (Finance minister Nirmala Sitharaman)

Finance minister Nirmala Sitharaman commented over reduce fuel prices | पेट्रोल-डिझेलच्या किंमती केव्हा कमी होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिलं असं उत्तर 

पेट्रोल-डिझेलच्या किंमती केव्हा कमी होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिलं असं उत्तर 

नवी दिल्ली - देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यात विरोध होताना दिसत आहे. अनेक ठिकाणीतर पेट्रोलच्या किमतींनी शंबरीही ओलांडली आहे. तर अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. इंधनाच्या किमती वाढत असतानाच, आता या किमती कमी केव्हा व्हायला लागतील? असा सवाल जनता सरकारला विचारू लागली आहे. (Finance minister Nirmala Sitharaman commented over reduce fuel prices)

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनाही या प्रश्नाचा सामना करावा लागला आहे. अहमदाबाद येथे गुरुवारी एक कार्यक्रमात निर्मला सीतारमन यांना विचारण्यात आले, की इंधनाच्या किमती सकार केव्हा कमी करणार? यावर त्या म्हणाल्या, की त्यांना हे सांगता येणार नाही... हे एक धर्म संकट आहे.

VIDEO: ...इलेक्ट्रिक स्कूटी चलावताना पडता-पडता थोडक्यात बचावल्या ममता बॅनर्जी! सुरक्षा रक्षकांनी असं सावरलं

भारतीय जनता पक्षाने (भाजप) आयोजित केलेल्या बुद्धिजिवींच्या एका बैठकीला संबोधित करताना सीतारमन यांनी बजेटवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, ''हे नव्या देशाचे बजेट आहे. आम्ही खासगी क्षेत्रावर विश्वास ठेवतो आणि देशाच्या विकासत भागिदारीसाठी आपले स्वागत आहे, असे हे बजेट स्पष्टपणे सांगते. हे बजेट भारतीय अर्थव्यवस्थेला एक वेगळी दिशा देते.

इंधनाचे वाढते दर गंभीर मुद्दा -
काही दिवसांपूर्वीच निर्मला सीतारमन यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीवर भाष्य केले होते. हा एक गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करून ग्राहकांना योग्य दरात इंधन उपलब्ध करून द्यायला हवे, असे त्या म्हणाल्या होत्या.

जर 'हा' अंदाज खरा ठरला तर पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार! जाणून घ्या, कुठपर्यंत पोहोचू शकते किंमत?

भारतात पेट्रोल, डिझेलच्या वाढ होण्यामागचं प्रमुख कारण काय?
खरे तर पेट्रोल, डिझेलचा दर कमी आहे. मात्र त्यापेक्षा त्यावरील करांचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक खर्च, डिलरचे कमिशन, केंद्राकडून आकारण्यात येणारे उत्पादन शुल्क आणि व्हॅट यांच्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होते. दिल्लीत पेट्रोलच्या दरातील करांचा वाटा ६० टक्के आहे. तर डिझेलच्या बाबतीत हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे. 

...तर अर्ध्यावर येऊ शकतात पेट्रोल डिझेलच्या किमती! मोदी सरकार 'हा' खास बदल करण्याच्या विचारात

मोदी सत्तेत आल्यापासून इंधन दरात किती बदल?
नरेंद्र मोदींनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यावेळी दिल्लीत पेट्रोलचा दर 71.14 रुपये प्रति लिटर होता. तर डिझेलसाठी 56.71 रुपये मोजावे लागत होते. तेव्हापासून आजपर्यंत पेट्रोलच्या दरात 26 टक्के, तर डिझेलच्या दरात 42 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मोदींनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात एका बॅरलचा दर 110 अमेरिकन डॉलर होता. आता एका बॅरलसाठी साधारणपणे 65 अमेरिकन डॉलर मोजावे लागत आहेत.

Petrol Diesel Hike : कुणावरही टीका कराण्याची इच्छा नाही, पण...; अखेर पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी मौन सोडलं!

 

Web Title: Finance minister Nirmala Sitharaman commented over reduce fuel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.