Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > वारसदार नाही व मृत्युपत्रही नाही?; मृत्यूनंतर मुदत ठेव कशी मिळवाल? जाणून घ्या...

वारसदार नाही व मृत्युपत्रही नाही?; मृत्यूनंतर मुदत ठेव कशी मिळवाल? जाणून घ्या...

भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी बँकांमधील मुदत ठेवींचा प्रश्न मार्गी लावणे अनिवार्य ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:25 IST2026-05-18T17:24:53+5:302026-05-18T17:25:26+5:30

भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी बँकांमधील मुदत ठेवींचा प्रश्न मार्गी लावणे अनिवार्य ठरते.

No heirs and no will?; How to get a fixed deposit after death? Find out... | वारसदार नाही व मृत्युपत्रही नाही?; मृत्यूनंतर मुदत ठेव कशी मिळवाल? जाणून घ्या...

वारसदार नाही व मृत्युपत्रही नाही?; मृत्यूनंतर मुदत ठेव कशी मिळवाल? जाणून घ्या...

आपल्या पालक किंवा आजी-आजोबांचे निधन होणे हा कुटुंबासाठी मोठा धक्का असतो. अशा कठीण काळात आर्थिक बाबींकडे लक्ष देणे कोणालाच आवडत नाही, पण भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी बँकांमधील मुदत ठेवींचा प्रश्न मार्गी लावणे अनिवार्य ठरते. अशा परिस्थितीत पैसे मिळविण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

आधी 'नॉमिनी' तपासा

बंधित एफडीवर कोणी नॉमिनी असेल, तर मृत्यू प्रमाणपत्र आणि ओळखपत्राची पडताळणी करून बँक लगेच पैसे सुपूर्द करते. लक्षात ठेवा, नॉमिनी हा पैशांचा ‘मालक’ नसून तो केवळ ‘विश्वस्त’ असतो. कायदेशीर वारसांत या पैशांचे वाटप नंतर होऊ शकते.

वारसदार नसेल तर काय?

जर एफडीवर कोणाचेही नाव नसेल, तर बँक कायदेशीर वारस प्रमाणपत्र मागते. वारसदार ठरवताना हिंदू वारसा कायद्यानुसार मृताची पत्नी, मुले आणि आई यांचा पहिला हक्क असतो.

कागदपत्रे काय लागतात?

  • मृताचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र.
  • एफडीच्या मूळ पावत्या किंवा तपशील.
  • सर्व हयात कायदेशीर वारसांचे ओळखपत्र आणि पत्ते.
  • जर एकाच व्यक्तीला पैसे हवे असतील, तर  इतरांचे 'ना हरकत प्रमाणपत्र'

कोर्टाची पायरी आणि मग लागणार वेळ

रक्कम मोठी असल्यास आणि कुटुंबात वाद असल्यास बँक कोर्टाकडून 'सक्सेशन सर्टिफिकेट' आणण्यास सांगते. ही न्यायालयीन प्रक्रिया असल्याने त्याला वेळ लागू शकतो. मात्र, लहान रकमांसाठी बँका काही हमीपत्रांच्या आधारे प्रक्रिया सोपी करू शकतात.

महत्त्वाचा सल्ला 

कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यापूर्वी थेट बँकेत जाऊन त्यांच्या अटी समजून घ्या. कुटुंबात संवाद असेल तर प्रक्रिया वेगाने होते. कुटुंबात संवाद नसेल, तर मात्र गोष्टी अवघड होतात. कोर्ट-कचेऱ्यांचे प्रकार होतात. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ सांगतात की, या सर्व कटकटी टाळण्यासाठी आपल्या सर्व गुंतवणुकीवर 'नॉमिनी' नोंदविणे हाच सर्वात उत्तम आणि सोपा मार्ग आहे

Web Title : उत्तराधिकारी नहीं, वसीयत भी नहीं? फिक्स्ड डिपॉजिट कैसे प्राप्त करें?

Web Summary : मृतक की फिक्स्ड डिपॉजिट का दावा करने के लिए नामांकित व्यक्ति की जाँच आवश्यक है। इसके बिना, कानूनी उत्तराधिकारी प्रमाणपत्रों की आवश्यकता होती है। बड़ी रकम या विवादों के लिए बैंक अदालत से उत्तराधिकार प्रमाण पत्र मांग सकते हैं। नामांकित व्यक्ति का पंजीकरण कानूनी जटिलताओं और देरी से बचते हुए प्रक्रिया को सरल बनाता है।

Web Title : No Will, No Heir? How to Claim a Fixed Deposit?

Web Summary : Claiming a deceased's fixed deposit requires checking for a nominee. Without one, legal heir certificates are needed. Banks may request court succession certificates for large sums or disputes. Nominee registration simplifies the process significantly, avoiding legal complexities and delays.