SBI FD Rates News: शेअर बाजार आणि सोन्या-चांदीच्या बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना एक मोठा दिलासा दिला आहे. बँकेने विविध कालावधीच्या मुदत ठेव (FD) व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर हे नवीन व्याजदर लागू होणार आहेत. हे नवीन दर आज, म्हणजेच १८ मे २०२६ पासून देशभरात प्रभावी झाले आहेत.
सुधारित व्याजदर खालीलप्रमाणे:
बँक ऑफ इंडियाचे नवीन FD व्याजदर (सर्वसामान्य ग्राहकांसाठी)
१ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी: ६.५ टक्के व्याज
२ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी: ६.६ टक्के व्याज
थेट ३ वर्षांची एफडी : ६.७ टक्के व्याज
ज्येष्ठ आणि अति-ज्येष्ठ नागरिकांसाठी 'बंपर' व्याजदर
बँकेने आपल्या ज्येष्ठ आणि अति-ज्येष्ठ ग्राहकांना नेहमीप्रमाणे अतिरिक्त व्याजाचा फायदा दिला आहे.
६ महिने ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी:
ज्येष्ठ नागरिकांना सामान्य दरांपेक्षा ५० बेसिस पॉईंट्स (0.50%) अतिरिक्त व्याज मिळेल.
अति-ज्येष्ठ नागरिकांना ६५ बेसिस पॉईंट्स (0.65%) अधिक व्याज दिले जाईल.
३ वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी:
दीर्घकालीन गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत थेट ७५ बेसिस पॉईंट्स (0.75%) अधिक व्याज मिळणार आहे.
अति-ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक म्हणजेच ९० बेसिस पॉईंट्स (0.90%) चा अतिरिक्त फायदा होणार आहे.
