lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Amazon Apple Days Sale: iphone, iPad आणि MacBook वर मिळतायत जबरदस्त ऑफर्स

Amazon Apple Days Sale: iphone, iPad आणि MacBook वर मिळतायत जबरदस्त ऑफर्स

पाहा काय आहेत ऑफर्स, १७ मार्च पर्यंत सुरू राहणार सेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 07:01 PM2021-03-13T19:01:50+5:302021-03-13T19:03:05+5:30

पाहा काय आहेत ऑफर्स, १७ मार्च पर्यंत सुरू राहणार सेल

amazon apple days sale now live all offers on iphone ipad macbook more devices hdfc bank customers will get benefits too | Amazon Apple Days Sale: iphone, iPad आणि MacBook वर मिळतायत जबरदस्त ऑफर्स

Amazon Apple Days Sale: iphone, iPad आणि MacBook वर मिळतायत जबरदस्त ऑफर्स

Highlights१७ मार्च पर्यंत सुरू राहणार सेलHDFC बँकेच्या ग्राहकांना मिळणार अतिरिक्त लाभ

Amazon इंडियानं आपल्या  Apple Days sale सुरू केला आहे. यामध्ये ग्राहकांना Apple iPhone 12 सीरिज,  iPad Mini, MacBook Pro लॅपटॉप आणि अन्य प्रोडक्ट्स कमी दरात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. शुक्रवारी १२ मार्चपासून या सेलची सुरूवात झाली असून १७ मार्च पर्यंत हा सेल सुरू राहणार असल्याची घोषणा Amazon नं केली आहे. 

Apple Days सेलदरम्यान एचडीफसी बँकेच्या कार्ड धारकांना आयफोन १२ मिनीवर ८ हजार रूपयांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. तसंच या व्यतिरिक्त ग्राहकांना अन्य प्रोडक्ट्सवरही सूट देण्यात येणार आहे. या सेलदरम्यान कंपनी iPhone 12 सीरिज, iPhone 11 सीरिज आणि दुसऱ्या Apple प्रोडक्ट्सवर मोठ्या ऑफर्स देत आहे. यादरम्यान आयफोन १२ मिनी ग्राहकांना ६७,१०० रूपयांना विकत घेता येईल. या स्मार्टफोनची मूळ किंमत ही ६९,९०० रूपये इतकी आहे. यावर ग्राहकांना सध्या २,८०० रूपयांची सूट मिळत आहे. १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या आयफोन १२ मिनीची किंमत ७१,९०० रूपये ठेवण्यात आली आहे. तर याच्या २५६ जीबी व्हेरिअंटची किंमत ८९,३९९ रूपये इतकी आहे.

याशिवाय HDFC बँकेच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डावर ६ हजार रूपयांची अतिरिक्त सूटही देण्यात येईल. तसंच आयफोन ११ प्रो हा ग्राहकांना ७९,९०० रूपयांना विकत घेता येईल. याची मूळ किंमत ही ९९,९०० रूपये इतकी आहे. या सेलदरम्यान एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना ३००० रूपयांची इन्स्टन्ट सूट मिळणार असून आयपॅडवर ९ हजार रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळेल. तसंच एक्सचेंज ऑफरसह एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना नो कॉस्ट EMI चा ऑप्शनही निवडता येईल. 

Web Title: amazon apple days sale now live all offers on iphone ipad macbook more devices hdfc bank customers will get benefits too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.