ठळक मुद्दे80 च्या दशकांत प्रसिद्ध अभिनेते संजय खान आणि झीनत यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगल्या होत्या.  मासिकांमध्येही त्यांनी लग्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

एकेकाळी आपल्या बोल्ड भूमिकांमुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री झीनत अमान यांना आत्ता पाहाल तर धक्का बसेन. होय, झीनत अमान यांचे ताजे फोटो समोर आले आहेत आणि यात त्यांना ओळखणेही कठीण होत आहे. पांढरे केस, डोळ्यांवर मोठ्या फ्रेमचा चष्मा अशा रूपात त्यांना पाहून चाहतेही हैराण आहेत.
झीनत यांना बॉलिवूड इंडस्ट्रीत 50 वर्षे पूर्ण झालीत. यानिमित्त झीनत यांनी आपल्या काही जवळच्या लोकांसोबत केक कापून आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व त्यांचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यात झीनतचे केस पूर्णपणे पांढरे झालेले दिसत आहेत. अर्थात त्यांच्या चेह-यावरचा चार्म आणि ओठांवरचे सुंदर हास्य आजही तितकेच टवटवीत आहे.

झीनत यांना बॉलिवूडमध्ये ‘झीनी बेबी’ म्हणूनही ओळखले जायचे. ‘हरे राम हरे कृष्णा’च्या सेटवर देवानंद तिला याच नावाने हाक मारायचे. यानंतर अनेकजण तिला याच नावाने बोलवू लागलेत.
1970 साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी करणा-या झीनत अमान यांनी लॉस एंजलिमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. यानंतर मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिदीर्ची सुरुवात केली होती. 1971साली ओ.पी. राल्हन यांच्या ‘हलचल’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

80 च्या दशकांत प्रसिद्ध अभिनेते संजय खान आणि झीनत यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगल्या होत्या.  मासिकांमध्येही त्यांनी लग्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
मात्र 1979 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा होत्या. याचदरम्यान दोघांनी ‘अब्दुल्ला’ या सिनेमात एकत्र काम केले होते. चित्रपटाचे शूटिंग झाल्यानंतर झीनत दुस-या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाल्यात.  संजय यांनी फोनवरुन झीनतला गाणे शूट करण्यास सांगितले. मात्र व्यस्त शेड्यूल्डमुळे झीनत यांनी नकार दिला होता. झीनतच्या नकारामुळे संजय भडकले होते. त्यांनी झीनतला खूप बरेवाईट सुनावले.  एका मॅगॅझिनमध्ये आलेल्या वृत्तानुसार चिडलेल्या संजय खान यांनी रागात झीनत यांना मारहाण केली होती. त्यांनी तिला इतकी जबर मारहाण केली की, झीनत यांच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली होती. एका डोळ्याची दृष्टी कमी झाली होती.  

या घटनेनंतर झीनत आणि संजय खान यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाते. त्यानंतर तिने मजहर खान यांच्याशी लग्न केले.1985 मध्ये झीनत अमान यांनी मजहर खान यांच्यासोबत लग्न केले. पण झीनत आणि मजहर यांचे वैवाहिक आयुष्य सुखी नव्हते.  लग्नानंतर काहीच दिवसांत दोघांमध्येही वाद होऊ लागलेत. असे म्हणतात की, मजहर झीनत यांना मारहाण करायचे.

दोन मुले आणि पत्नी असताना मजहर यांनी रूबिना मुमताजसोबत दुसरे लग्न केले. ही गोष्ट झीनत यांच्या जिव्हारी लागली आणि झीनत यांनी मजहर यांच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत मजहर किडनीच्या आजाराने अंथरूणाला खिळले होते. घटस्फोट होण्याआधीच मजहर यांचे निधन झाले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: zeenat aman celebrate 50 years in film industry actress change the trend of bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.