बॉलिवूडला अलविदा म्हणणा-या झायरा वसीमने लिहिली गर्भित पोस्ट; वाचा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 10:15 AM2019-07-14T10:15:48+5:302019-07-14T10:16:53+5:30

अभिनेत्री झायरा वसीमने काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली होती. आता झायराने एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

zaira wasim pens down an emotional post on instagram | बॉलिवूडला अलविदा म्हणणा-या झायरा वसीमने लिहिली गर्भित पोस्ट; वाचा..!

बॉलिवूडला अलविदा म्हणणा-या झायरा वसीमने लिहिली गर्भित पोस्ट; वाचा..!

googlenewsNext
ठळक मुद्देआमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या झायरा वसीमचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेत्री झायरा वसीमने काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली होती. धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडण्याच्या झायराच्या या अनपेक्षित निर्णयाने अनेकांना धक्का बसला. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावरही याची खूप चर्चा झाली. यादरम्यान झायरा काहीही बोलली नाही. पण आता तिने पुन्हा एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
इन्स्टाग्रामवर एका इमारतीचे अस्पष्ट चित्र शेअर करत, ‘तुमच्या आतील आग विझू देऊ नका, ’असे तिने म्हटले आहे. ‘नैराश्याच्या दलदलीत एका ज्योतीच्या आधाराने चमकत राहा. आयुष्याच्या एकटेपणातही तुमच्या आतील हिरो मरू देऊ नका. जे तुम्हाला हवे, ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता,’असेही तिने म्हटले आहे.  या गर्भित पोस्टचा अर्थ काय, हे मात्र झायराच ठाऊक.


आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या झायरा वसीमचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा झायराचा अखेरचा चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यानंतर झायराने अचानक बॉलिवूडला अलविदा म्हटले होते.  

‘अल्लाह के रास्ते से भटक गई थी...’, असे सांगत झायराने आपला हा निर्णय चाहत्यांशी शेअर केला होता. ‘पाच वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने माझे आयुष्य बदलले होते. माझा हा प्रवास प्रचंड थकवणारा होता. या पाच वर्षांत मी स्वत:शीच झगडले. पण इतक्या लहान वयात मी इतका मोठा संघर्ष करू शकत नाही. त्यामुळे मी बॉलिवूडशी नाते तोडते आहे. मी अतिशय विचारपूर्र्वक हा निर्णय घेतला आहे...’, असे झायराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते.

 

Web Title: zaira wasim pens down an emotional post on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.