ठळक मुद्दे‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यानंतर झायराने अचानक बॉलिवूडला अलविदा म्हटले होते.  

दंगल आणि स्काय इज पिंक या सिनेमात झळकलेली अभिनेत्री झायरा वसीमने कधीच बॉलिवूडमधनू संन्यास घेतला. धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडण्याच्या झायराच्या या अनपेक्षित निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होती. सोशल मीडियावरही याची खूप चर्चा झाली होती. आता झायराने तिच्या चाहत्यांना एक विनंती केली आहे. होय, आपले सर्व फोटो डिलीट करावे, अशी विनंती तिने चाहत्यांना केली आहे. यामागचे खास कारणही तिने सांगितले आहे.


 

झायराने एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिने सर्वप्रथम चाहत्यांचे आभार मानले आहेत. ती लिहिते, ‘तुमच्या निरंतर प्रेमासाठी आभार. तुम्ही माझी ताकद आहात. प्रत्येक गोष्टीत मला सोबत केल्याबद्दल तुमचे आभार. मी विनंती करते की, कृपया तुमच्या अकाऊंटचे माझे फोटो डिलीट करा आणि दुस-या फॅन पेजेसलाही माझे फोटो डिलीट करण्यास सांगा. इंटरनेटवरून माझे सर्व फोटो हटविणे अशक्य आहे. त्यामुळे किमान माझ्या फॅन पेजला तरी मी फोटो डिलीट करण्याची विनंती करू शकते. मी आयुष्याचा एक नवा चॅप्टर सुरु करतेय. यामुळे मला मदत मिळेल.’

आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या झायरा वसीमचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा अलीकडे रिलीज झाला होता.  हा झायराचा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यानंतर झायराने अचानक बॉलिवूडला अलविदा म्हटले होते.  

अल्लाह के रास्ते से भटक गई थी..., असे सांगत झायराने आपला हा निर्णय चाहत्यांशी शेअर केला होता. ‘पाच वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने माझे आयुष्य बदलले होते. माझा हा प्रवास प्रचंड थकवणारा होता. या पाच वर्षांत मी स्वत:शीच झगडले. पण इतक्या लहान वयात मी इतका मोठा संघर्ष करू शकत नाही. त्यामुळे मी बॉलिवूडशी नाते तोडते आहे. मी अतिशय विचारपूर्र्वक हा निर्णय घेतला आहे...’, असे झायराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते.

‘मी पण एक माणूस आहे’; झायरा वसीमने ट्विटरवर वापसी करत सांगितले अकाऊंट डिअ‍ॅक्टिवेट केल्याचे ‘हे’ कारण!

‘अल्लाह’साठी सिनेसृष्टी सोडणाऱ्या सना खानने मौलवींशी गूपचूप केला ‘निकाह’, व्हिडीओ व्हायरल

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: zaira wasim asks fan pages to remove her photos and stop sharing them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.