You will Be Shocked To Know That Kangana Ranaut And Rhea Chakraborty Become The Most Searchable On The internet In the last few days | इंटरनेटवर गेल्या काही दिवसांत मोस्ट सर्चेबल ठरल्या 'या' दोन अभिनेत्री, या दोघांमुळे इतर राहिले दुर्लक्षित

इंटरनेटवर गेल्या काही दिवसांत मोस्ट सर्चेबल ठरल्या 'या' दोन अभिनेत्री, या दोघांमुळे इतर राहिले दुर्लक्षित

इंटरनेटवरील मोस्ट सर्च सेलिब्रिटींच्या यादीत आजपर्यंत बोल्ड तसंच हॉट अभिनेत्री सनी लिओनी आघाडीवर होती. तिच्यानंतर दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा यांचा नंबर लागतो. या सगळ्यांनी  नेटिझन्सना अक्षरक्ष: वेड लावलं होतं. त्यानंतर कोरोना लॉकडाऊन काळात गायिका कनिका कपूर कोरोना पॉजिटीव्ह आढळ्यामुळे मोस्ट सर्च सेलिब्रेटी ठरली होती. तिच्याविषयी त्या दरम्यान इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले गेले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मोस्ट सर्चेबल सेलिब्रेटींच्या यादीत दोन व्यक्तीबाबत अधिक इंटरनेटवर सर्च केले गेले. त्या दोन व्यक्ती कोण हे काही वेगळे सांगायला नको. अख्या जगाचे लक्ष वेधून घेणा-या या दोन व्यक्ती आहेत. बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत आणि दुसरी आहे सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती.

 

मंगळवारी रियाला एनसीबीकडून अटक झाली. त्यानंतर नेटिझन्सही रियाचे ट्विट रिट्विट करत सोशल मीडियावर मिम्स बनवल व्हायरल केले गेले. बघावं तो फक्त रियाविषयी आपले मतं मांडताना दिसला. संतप्त प्रतिक्रीया उमटल्या तर कधी फनी जोक्सही व्हायरल झाले. सुशांतच्या मृत्यूनंतर अचानक देसी स्टाइलमध्ये तिची बाजु मांडताना व्हिडीओत दिसली. एरव्ही मॉडर्न अंदाजात राहणारी रियाला सुशांत मृत्युप्रकरणी देसी अवतार धारण करावा लागला. त्यावरही जबरदस्त मिम्स बनवले गेले. स्वतःची बाजु मांडायची असेल तर अशाप्रकारे देसी अवतारात लोकांसमोर यावे लागते तेव्हाच लोकं कुठे ऐकतात असे बोलत तिची खिल्लीही उडवली गेली.

दुसरीकडे बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत चर्चेत आहे. कोणी तिच्याविरोधात तर कोणी तिच्या सपोर्टमध्ये बोलतना दिसताना दिसत आहे. तिच्या मुंबईत एंट्री करण्यापासून तर बीएमसीने तिच्या ऑफिसवर उचलेला हातोडा सगळ्याच गोष्टीबाबत तिच्याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सध्या कंगणामय झालंय असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मुंबईत 48 कोटींचे अलिशान कार्यालय असलेल्या कंगनाकडे कोट्यावधी रूपयांची संपत्ती आहे. बॉलिवूडमध्ये कंगनाने तिच्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये अपार मेहनत केली आणि अभिनेत्रीच नाही तर निर्माता, दिग्दर्शक, लेखक म्हणूनही ओळख निर्माणण केली आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: You will Be Shocked To Know That Kangana Ranaut And Rhea Chakraborty Become The Most Searchable On The internet In the last few days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.