ठळक मुद्देनर्गिस व अमेरिकन दिग्दर्शक मॅट अलोंजो नर्गिस यांच्या नात्याचाही यावर्षात अंत झाला.

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप-पॅचअप तसेही नवीन नाही. पण तरीही या ब्रेकअप-पॅचअपची चर्चा होतेच. अशा बातम्या चवीने चघळल्या जातात. यावर्षी बॉलिवूडच्या अनेक जोड्या तुटल्या. वर्षाअखेरिस याच तुटलेल्या जोड्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

सारा अली  खान - कार्तिक आर्यन 

2019 च्या सुरुवातीला सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. ‘आजकल 2’ या सिनेमाच्या सेटवर या दोघांचे प्रेम बहरले. मग काय, हे जोडपे सर्रास एकत्र दिसू लागले. पण यानंतर काहीच महिन्यांत दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली. काहींच्या मते, या दोघांनी नात्यात ब्रेक घेतला आहे. आता ब्रेक की ब्रेकअप हे सारा व कार्तिकच जाणोत. पण या ब्र्रेकअपची या वर्षात जोरदार चर्चा झाली. 

 विकी कौशल-हरलीन सेठी

 विकी कौशल मॉडेल हरलीन सेठीला डेट करत असल्याच्या बातम्या आल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण या वर्षांत दोघांचेही ब्रेकअप झाले. हरलीनने विकीला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यानंतर या ब्रेकअपची चर्चा सुरु झाली. विकीला अनफॉलो केल्यानंतर हरलीनने काही हार्ट ब्रेकिंग पोस्ट शेअर केल्या होत्या. अर्थात हरलीनच्या इन्स्टा अकाऊंटवर आजही विकीचे काही फोटो आहेत.    

इलियाना डिक्रूज -अ‍ॅन्ड्र्यू नीबोन 

इलियाना डिक्रूज गेल्या अनेक वर्षांपासून फोटोग्राफर अ‍ॅन्ड्र्यूनीबोन याला डेट करत होती. या दोघांनी लग्न केल्याच्या अफवाही मध्यंतरी उठल्या होत्या. सोबत इलियाना प्रेग्नंट आहे, अशीही अफवा पसरली होती. पण आता इलियाना व  अ‍ॅन्ड्र्यू दोघांचेही ब्रेकअप झाले आहे. या ब्रेकअपनंतर इलियानाने बॉयफ्रेन्डसोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत.  

श्रुती हासन- मायकेल कॉर्सेल 

सुपरस्टार कमल हासनची लेक गेल्या दोन वर्षांपासून मायकेल कोर्सेलला डेट करते आहे. मायकेल कोर्सेलसोबत श्रुतीचे रिलेशनशीप 2016मध्ये सुरु झाले होते. श्रुतीसोबत मायकेल नेहमीच भारतात फिरताना दिसायचा.  श्रुती मायकेल कोर्सेलसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा होती. इतकेच नाही तर श्रुतीने वडील कमल कमल हासनसोबत मायकेलची भेटदेखील घालून दिली होती. पण लग्नाआधीच हे नाते तुटले. 

 नर्गिस फाखरी-मॅट अलोंजो 

नर्गिस व अमेरिकन दिग्दर्शक मॅट अलोंजो नर्गिस यांच्या नात्याचाही यावर्षात अंत झाला. 2017 पासून दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते. यावर्षी दोघेही लग्न करणार होते. पण त्याआधी दोघांत बिनसले व ब्रेकअप झाले. 

Web Title: Year Ender 2019 : These couple of Bollywood breaks this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.