Yashraj Mukhate's latest Yummy Yummy song pokes fun at veg biryani watch video | इटस् पुलाव ब्रो! ‘पावरी’ विसरा आता आला ‘पुलाव’; यशराज मुखातेच्या नव्या रॅपची इंटरनेटवर धमाल

इटस् पुलाव ब्रो! ‘पावरी’ विसरा आता आला ‘पुलाव’; यशराज मुखातेच्या नव्या रॅपची इंटरनेटवर धमाल

ठळक मुद्देकेवळ चाहतेच नाही तर  यशराजच्या या व्हिडीओवर अभिनेत्री अमृता खानविलकर हिने कमेंट करत कौतुक केले आहे.  काय रॅप केलंय, अशी कमेंट अमृताने केलीय.  

यशराज मुखाते (Yashraj Mukhate) त्याच्या युनिक म्युझिक स्टाईलसाठी ओळखला जातो. डायलॉगला तो म्युझिक व रॅपचा असा काही तडका देतो की, त्याचा प्रत्येक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतो. काही दिवसांपूर्वी ‘पावरी हो रही है’ हा डायलॉग बीट्ससोबत मॅच करून त्याने हिट केला होता. आता काय तर त्याचे आणखी एक रॅप सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. इंटरनेटवर त्याचे हे नवे ‘पुलाव’ रॅप सॉन्ग ट्रेंड होतेय.  (Yashraj Mukhate Video)
 सोशल मीडिया सेलिब्रिटी स्मिता सातपुते यांच्या एका व्हिडीओवर आधारित रॅप सॉन्ग यशराजने तयार केले आहे. सोशल मीडियावर कॉमेडी रील  पोस्ट करणा-या स्मिता ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्यासाठी सद्धा ओळखल्या जातात. यशराजने तयार केलेल्या रॅप सॉन्गच्या सुरुवातील स्मिता सातपुते कमेंट करणा-यांना उत्तर देताना दिसताय. 

‘एक्सक्युज मी... कमेंट करने वालो नो... याद रखना... मेरी जिंदगी है... कैसे भी जियूं... तुमसे मतलब...’, असे त्या म्हणतात. त्यांच्या या डॉयलॉगला बिट्ससोबत मॅच करत यशराजने त्याचे रॅप सॉन्ग तयार केले आहे.
‘व्हेज बिर्याणी म्हणून कुठली डिश नसते. इट्स पुलाव ब्रो,’ असे एक मराठी वाक्य रॅप सॉन्गमध्ये आहे. या वाक्यावर चाहते भरभरून कमेंट्स देत आहेत. आता ‘इट्स पुलाव ब्रो’ ट्रेंड होणार, अशा आशयाच्या हजारो कमेंट्स चाहते देत आहेत.

केवळ चाहतेच नाही तर  यशराजच्या या व्हिडीओवर अभिनेत्री अमृता खानविलकर हिने कमेंट करत कौतुक केले आहे.  काय रॅप केलंय, अशी कमेंट अमृताने केलीय.  याआधी यशराजने तयार केलेले पावरी साँग ट्रेंड झाले होते. त्याआधी बिग बॉस फेम शेहनाज गीलच्या एका संवादावर त्याने तयार केलेले ‘त्वाडा कुत्ता टॉमी’ हे रॅपही चांगलेच लोकप्रिय झाले होते. ‘क्या ये सांडनी है’ या राखी सावंतच्या डायलॉगवरचे त्याचे रॅपही असेच लोकप्रिय झाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Yashraj Mukhate's latest Yummy Yummy song pokes fun at veg biryani watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.