प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये 'ही' महत्वाची भूमिका साकारणार सनी सिंह?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 08:59 AM2020-11-29T08:59:40+5:302020-11-29T09:01:50+5:30

मीडिया रिपोर्टनुसार आदिपुरूष सिनेमाचं शूटींग पुढील महिन्यापासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. आणि एकदाच शूटींग पूर्ण केलं जाईल.

Will Sunny Singh play Laxman in Prabhas starrer Adipurush | प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये 'ही' महत्वाची भूमिका साकारणार सनी सिंह?

प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये 'ही' महत्वाची भूमिका साकारणार सनी सिंह?

googlenewsNext

'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर'सारखा सुपरहिट सिनेमा देणारा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत त्याच्या आगामी बिग बजेट 'आदिपुरूष'सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर आधीच रिलीज करण्यात आला. या सिनेमात भगवान रामाची भूमिका अभिनेता प्रभास साकारणार आहे तर लंकेशची म्हणजे रावणाची भूमिक सैफ अली खान साकारणार आहे. आता अशी चर्चा आहे की, सिनेमात लक्ष्मणची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारेल.

प्रॉडक्शनसंबंधी एक सूत्राने सांगितले की, सनी सिंहला 'आदिपुरूष'मधील लक्ष्मणच्या भूमिकेसाठी संपर्क केला गेलाय. जर सगळं काही ठीक झालं तर सनी सिंह पूर्णपणे वेगळ्या अवतारात आणि भूमिकेत पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. सनी सिंहला प्रभाससोबत स्क्रीन शेअर करण्याची शानदार संधी मिळणार आहे. 

क्रिती सेनन साकारणार सीतेचा रोल

गेल्या काही दिवसांपासून या सिनेमातील मुख्य सीतेच्या भूमिकेसाठी वेगवेगळ्या अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. आता 'मुंबई मिरर' च्या एका रिपोर्टनुसार, आधी सीतेच्या भूमिकेसाठी अनुष्का शेट्टी, अनुष्का शर्मा, कियारा अडवाणी आणि किर्ति सुरेश यांच्या नावाची चर्चा होती. पण आता मीडिया रिपोर्टनुसार या भूमिकेसाठी क्रिती सेननचं नाव फायनल झालं आहे.

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमाचं शूटींग पुढील महिन्यापासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. आणि एकदाच शूटींग पूर्ण केलं जाईल. अशीही माहिती समोर आली की, या सिनेमाचं शूटींग क्रोमावर स्टुडीओत होईल. यात व्हिएफएक्सच्या माध्यमातून स्पेशल इफेक्ट्स टाकले जातील.
 

Web Title: Will Sunny Singh play Laxman in Prabhas starrer Adipurush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.