ठळक मुद्देसंगीता आणि सलमान 27 मे 1994 ला लग्न करणार होते. पण अचानक त्यांचे लग्न मोडले. संगीता आणि सलमानच्या लग्नाची तयारी देखील सुरू झाली होती. पण त्याचदरम्यान सोमी अली सलमानच्या आयुष्यात आली असल्याचे संगीताला कळले आणि संगीताने लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूड दबंग खान सलमान खानच्या भारत या चित्रपटाला समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच प्रेक्षकांनी देखील पहिल्याच दिवशी या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तगडी कमाई केली आहे. सलमानचा हा चित्रपट देखील प्रचंड हिट होणार अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. 

सलमान खान त्याच्या व्यवसायिक आयुष्यासाठी जितका चर्चेत असतो. तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील नेहमीच चर्चेत राहिला आहे. तो सध्या युलिया वँटर या मॉडेलला डेट करत असल्याचे म्हटले जाते. पण त्याने किंवा युलियाने कधीच ही गोष्ट मान्य केलेली नाही. सलमानची पन्नाशी पार झाली असली तरी आजही सलमान अविवाहित आहे. सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. संगीता बिजलानीसोबत सलमान लग्न देखील करणार होता.

सलमान आणि संगीताच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले असून त्यांनी लग्न करण्याचा देखील विचार केला होता. जसीम खान यांनी सलमान खानच्या आयुष्यावर बीईंग सलमान हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की, संगीता आणि सलमान 27 मे 1994 ला लग्न करणार होते. पण अचानक त्यांचे लग्न मोडले. संगीता आणि सलमानच्या लग्नाची तयारी देखील सुरू झाली होती. पण त्याचदरम्यान सोमी अली सलमानच्या आयुष्यात आली असल्याचे संगीताला कळले आणि संगीताने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तिने या गोष्टीविषयी अनेक वर्षांनंतर मीडियात कबूल देखील केले होते. 

सलमानने देखील ही गोष्ट करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात मान्य केली होती. त्याने सांगितले होते की, त्याचे लग्न ज्या मुलीसोबत ठरले होते, तिला तो फसवतो आहे हे तिला कळल्यामुळे तिने हे लग्न मोडले होते. सलमानसोबत लग्न मोडल्यानंतर काही वर्षांनंतर संगीताने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले होते. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. संगीता आणि सलमानच्या ब्रेकअपनंतरही ते दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सलमानच्या घरातील समारंभात, पार्टींना ती आवर्जून हजेरी लावते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Why Sangeeta Bijlani called off marriage with Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.