This Is Why Riya Sen Doing Photoshoot Again And Again | पुन्हा एकदा रिया सेनचा हॉट अंदाज आला समोर,या कारणामुळे सतत करत असते फोटोशूट
पुन्हा एकदा रिया सेनचा हॉट अंदाज आला समोर,या कारणामुळे सतत करत असते फोटोशूट

'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी मनी' या सिनेमातून रिया सेन रसिकांच्या भेटीला आली होती. काही मोजके सिनेमांचा अपवाद वगळता तिला बॉलीवुडमध्ये फारसं यश मिळालं नाही. तसेच तिला फारशा बॉलिवूड ऑफर्सही मिळाल्या नाहीत त्यामुळे अभिनेत्री म्हणून रिया बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करू शकली नाही. बॉलिवूडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं रियाला वाटतं. म्हणूनच की काय ती सध्या आपले वेगवेगळ्या अंदाजातील फोटोशूट करून सा-यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा रियाने फोटोशूट केले आहे. त्या फोटोमध्येही तिचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळत आहे. 


मुळात डोकं नसलेली एक अभिनेत्री अशी रियाची प्रतिमा बॉलिवूडमध्ये निर्माण झाली होती ती इमेज तिला बदलायची होती. त्यामुळेच तिने  बंगाली सिनेमांच्या ऑफर्स स्विकारल्या आणि काही तरी वेगळं कऱण्याचा प्रयत्न केल्याचे खुद्द रियानेच सांगितले होते. 

रियानं काही दिवसांपूर्वी आलेल्या लोन्ली गर्ल या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं. यांत तिनं समलैंगिक भूमिका साकारली होती. बॉलिवुडमध्ये चुकीच्या वेळी एंट्री मारली असंही तिला वाटतं. ज्यावेळी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं त्यावेळी लहान होतो आणि फारशी जाण नव्हती. इथलं वातावरण, लोक यांची माहिती नव्हती असं रियाला वाटतं. मात्र काळानुरुप वयानुसार आपल्यात बदल झाले असून चांगलं काय, वाईट काय याची समज आल्याचं तिने सांगितले आहे. 

Web Title: This Is Why Riya Sen Doing Photoshoot Again And Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.