Why does Sara Ali Khan go to Goa for vacation? The photo came a day before the NCB inquiry | व्हॅकेशनसाठी गोव्यालाच का जाते सारा अली खान? NCB चौकशीच्या एक दिवसाआधीचे फोटो आले समोर

व्हॅकेशनसाठी गोव्यालाच का जाते सारा अली खान? NCB चौकशीच्या एक दिवसाआधीचे फोटो आले समोर

गेल्या काही दिवसांमध्ये सारा अली खान गोव्यामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसली. कधी कुटुंबासोबत तर कधी मित्रांसोबत सारा व्हॅकेशनसाठी केवळ गोव्यालाच जाणे पसंत करते. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. यातून तिचे फेव्हरेट डेस्टीनेशन हे गोवा असल्याचे स्पष्ट होते.कधी पुलशेजारी बिकीनमध्ये तर कधी हॉटेलच्या रुममध्ये तर कधी गोव्याच्या रस्त्यांवर ती मजा मस्ती करताना पाहायला मिळाली. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गोवा व्हॅकेशनचे फोटो तिने शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तिचे चाहतेही तिला कमेंटस लाईक्स देत पसंती देत असताता.

 

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात जेव्हा साराचे नाव समोर आले तेव्हाही सारा गोव्यातच होती. दैनिक जागरनने दिलेल्या रिपोर्टनुसार एनसीबीने दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान तिघांनाही समन जारी केल्यानंतर चौकशीसाठी बोलावले होते. त्याच्या एक दिवसाआधीच सारा गोव्यात मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करत होती.  

पतौडी कुंटुबाची लाडली सारा अली खान एनसीबी चौकशीपूर्वी  गोव्यात आपल्या मित्रांसह मजा मस्ती करतानाचे फोटोही समोर आले आहेत.यापूर्वीही तिचे गोव्यातले फोटो सा-यांनी पाहिले आहेत. मात्र साराचे ड्रगप्रकरणात नाव आल्यापासून तिचे गोवा व्हॅकेशनचे फोटो खूप चर्चेत आहेत. हे फोटो पाहून साराचे गोव्यासहा काही खास कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. 

एनसीबीच्या चौकशी दरम्यान काय म्हणाली होती सारा? 

शुक्रवारी सारा अली खानला एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं होतं. यावेळी ड्रग्स केस आणि सुशांतबाबत तिची चार तास चौकशी करण्यात आली. असेही सांगितले जात आहे की, या चौकशीदरम्यान साराने सुशांतसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. Pledgetimes.com च्या माहितीनुसार साराने एनसीबीला सुशांतसोबतच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं. सुशांत त्यांच्या रिलेशनशिपमध्ये लॉयल नव्हता.रिलेशनशिपबाबत फार पझेसिव्ह नव्हता. तसेच त्याची साराने त्याला अधिकाधिक सिनेमाच्या ऑफर्स मिळवून देण्यासाठी मदत करावी. तसेच या सगळ्यात अडकायचे नव्हते. तिने तिचं करिअरही नुकतंच सुरू केलं होतं. त्यामुळे तिला तिच्या करिअरवर फोकस करायचं होतं त्यामुळे ते वेगळे झाले.

शूटिंगदरम्यान ब्रेकमध्ये सुशांत घ्यायचा ड्रग्स, साराचा खुलासा 

साराने 'केदारनाथ' सिनेमाच्या शूटिंगवेळी सुशांतला अनेकदा व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेतल्याचे पाहिले असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. 2018 मध्ये केदारनाथ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ब्रेकमध्ये ड्रग्स घ्यायचा. अनेकदा त्याला त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिल्याचेही साराने सांगितले. शुटिंगच्यावेळी सुशांत गांजा, चरस घेत होता,सेटवर बहुताशजणाना त्याबद्दल माहिती होती. आपण मात्र कधीही त्याचे सेवन केले नाही, तसेच कोणत्याही ड्रग तस्कराला ओळखत नसल्याची माहिती दिली असल्याचे सांगितले. तिचा ड्रायव्हर रईसने ड्रग्ज सेवनाबद्दलचा  केलेला आरोप तिने फेटाळून लावला असल्याचे सांगण्यात आले. तसेच 'केदरानाथ' शूटिंग दरम्यान ती  सुशांतच्या केप्री हाऊस इथल्या घरात त्याच्याबरोबर राहायलाही सारा गेली होती असेही तिने सांगितले.

 

Also Read: बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी

Also Read:खुश? की आणखी काही बाकी...! सुशांतबद्दलच्या सारा-श्रद्धाच्या खुलाशानंतर संतापली स्वरा भास्कर

Also Read: ड्रग्ज कनेक्शनमध्ये आणखी बडी नावे समोर येणार; क्षितिजला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Why does Sara Ali Khan go to Goa for vacation? The photo came a day before the NCB inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.