उर्वशी रौतेला आताच्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी बॉलीवूड मध्ये स्वतःच्या हिंमतीवर आपले स्थान निर्माण करत आहे. अभिनेत्री आपल्या कामाच्या कौशल्याने यशाच्या शिखरावर पोहचली आहे म्हणून उर्वशी रौतेलाने आपले मानधन वाढवण्याचा विचार केला आहे. उर्वशीने आपल्या आधीच्या मानधनातून वेतन वाढवून चक्क 7 कोटी केले आहे.

उर्वशीचा आगामी 'व्हर्जिन भानुप्रिया' हा सिनेमा आपल्या वर्जित विषयामुळे चर्चेत आला आहे. उर्वशी या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहेत, तसेच उर्वशीला सिनेमाच्या अन्य कलाकारांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन दिल्याचे म्हटले जात आहे. आता ताज्या बातमीनुसार  कळते की उर्वशीला अमिताभ बच्चन यांच्यासह सुपरहिट सिक्वलची ऑफर देण्यात आली होती पण वेळ मिळाला नसल्यामुळे ती तो सिनेमा करू शकली नाही.

तिच्या नुकत्याच झालेल्या प्रोजेक्ट व्हर्जिन भानुप्रियाबद्दल बोलताना उर्वशी रौतेला मुख्य भूमिकेत असून भानुप्रियाची भूमिका साकारत आहेत. या सिनेमात अर्चना पुरसिंग देलनाझ इराणी, राजीव गुप्ता, गौतम गुलाथी, ब्रिजेंद्र कला, निकी अनेजा वालिया आणि रुमान मोल्ला यांचा देखील सहायक भूमिका आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अजय लोहान यांनी केले असून श्रेयन्स महेंद्र धारीवालची निर्मिती आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Whoh! Urvashi Rautela Gets whopping 7 crore rupees for her Virgin Bhanupriya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.