ठळक मुद्देसध्या साहिल बॉडी बिल्डींगचे ट्रेनिंग देतो.

 एक्सक्यूज मी! क्या रे? मेरा दिल तेरे पे फिदा रे... ही लाईन आठवताच आठवतो तो एक अभिनेता. ‘स्टाईल’ या चित्रपटातील या अभिनेत्याचे नाव आहे साहिल खान. 2001 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने साहिल खान एकदम प्रकाशझोतात आला. या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. त्यामुळे ‘एक्सक्यूज मी’ नावाने या चित्रपटाचा सीक्वल बनवण्यात आला. यातही साहिल खान झळकला. या सीक्वलनेही ब-यापैकी बिझनेस केला.

या दोन चित्रपटानंतर साहिल खानने सात चित्रपटांत काम केले. पण पहिले दोन वगळता उर्वरित सगळे दणकून आपटले आणि पाठोपाठ साहिल खानच्या माथ्यावर ‘फ्लॉप’चा शिक्का बसला. याचा परिणाम म्हणजे  त्याला काम मिळणेही बंद झाले आणि साहिल खान नावाचा हा अभिनेता बॉलिवूडमधून बाद झाला. हा साहिल खान सध्या कुठे आहे, काय करतो, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साहिल खानने 2004 मध्ये अभिनेत्री निगार खानसोबत लग्न केले. पण कालांतराने दोघेही विभक्त झालेत. 2009 मध्ये हाच साहिल अचानक चर्चेत आला.  स्वत:पेक्षा 17 वर्षांनी मोठ्या महिलेसोबत त्याचे नाव जोडले गेले. ही महिला कोण तर टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ. 
 साहिल आणि आयशा एकेकाळी बिझनेस पार्टनर होते. या दोघांनी एक प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली. या कंपनीने एक चित्रपटही प्लान केला. पण हा चित्रपट प्रत्यक्षात बनलाच नाही. प्रॉडक्शन कंपनी डुबल्यानंतर साहिलने आयशाला सायबर सिक्युरिटी फर्मची कल्पना सुचवली आणि यासाठी पैसा उभारण्यास सांगितले. 13 महिन्यांतच ही फर्म बंद पडली. यानंतर आयशाने साहिलवर 5 कोटी हडपल्याचा आरोप केला.

2014 मध्ये हे प्रकरण कोर्टात गेले. कोर्टात साहिलने धक्कादायक खुलासा केला. आयशा व मी बिझनेस पार्टनर नव्हतो तर रिलेशनशिपमध्ये होतो. आयशा ज्या पैशांची गोष्ट करतेय, ते तिने माझ्या हॉलीडे व गिफ्टवर खर्च केलेत, असे त्याने सांगितले. आयशाने हे आरोप नाकारले. साहिल गे आहे. त्यामुळे त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असण्याचा प्रश्नच नाही, असा प्रतिदावा आयशाने केला. पण आयशाला खोटे ठरवण्यासाठी साहिलने त्याचे व आयशाचे इंटिमेट फोटो कोर्टापुढे सादर केलेत. चार महिन्यांपर्यंत आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर 2015 मध्ये आयशाने अखेर ही केस मागे घेतली. 

सध्या साहिल बॉडी बिल्डींगचे ट्रेनिंग देतो. गोव्यात ‘मसल अ‍ॅण्ड बीच’ नामक जिम चेन चालवतो. साहिल अधिकाधिक विदेशात राहतो आणि लक्झरी आयुष्य जगतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: where is style fame actor sahil khan and what is hedoing now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.