When vidya balan first time meet shah rukh khan actress share experience | शाहरुखसोबतच्या पहिल्या भेटीचे सत्य केले उघड विद्या म्हणाली, पाया खालची सरकली जमीन...

शाहरुखसोबतच्या पहिल्या भेटीचे सत्य केले उघड विद्या म्हणाली, पाया खालची सरकली जमीन...

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये विद्या बालनने आज 14 वर्षे पूर्ण केले. 14 वर्षांच्या करिअरमध्ये विद्याने अनेक अभिनेत्यांसोबत काम केले मात्र शाहरुख खानसोबत ती फक्त 2 गाण्यांमध्ये झळकली आहे.  एका फॅनच्या प्रश्नाला उत्तर देताना विद्या म्हणाली, पहिल्या मुलाखती दरम्यान माझ्या पाया खालची जमीन सरकली होती.   


विद्या बालन शाहरुखला पहिल्यांदा  2007 मध्ये ओम शांती ओम सिनेमातील दीवानगी-दीवानगी स्पेशल गाण्याच्या शूटिंग दरम्यान भेटीली होती. त्यानंतर शाहरुखने विद्याच्या बेबी सिनेमात स्पेशल अपीरियन्स दिला होता. विद्या म्हणाली, शाहरुखची पर्सनालिटी खूपच चार्मिंग आहे मला वाटले होते पहिल्या भेटी दरम्यान माझ्या पायाखालची जमिन सरकेल. पुढे ती म्हणाली, एखादी चांगली स्क्रिप्ट आली आणि त्या सिनेमात जर शाहरुख काम करत असेल तर मला काम करायला नक्की आवडेल.   


15 ऑगस्टला विद्या बालनाचा मिशन मंगल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात विद्याने वैज्ञानिक आणि गृहिणीची भूमिका चोख निभावली आहे. मिशन मंगल सिनेमाची  बॉक्स ऑफिसवरील घौडदौड अजूनही कायम आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 29.16 कोटींची कमाई करत नवा विक्रम रचला होता. आतापर्यंत या सिनेमाने 60 कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली आहे. यात विद्यासोबत अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिका आहेत. समीक्षकांनीही या सिनेमाचे कौतूक केले आहे.   

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When vidya balan first time meet shah rukh khan actress share experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.