जेव्हा या स्टारकिडने सोशल मीडियावर शेअर केला क्लीवेज फोटो,नेटीझन्सही झाले होते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:29 PM2020-04-27T15:29:45+5:302020-04-27T15:33:37+5:30

सुहाना खानच्या फोटोवर ट्रोल करत तिला संमिश्र प्रतिक्रीया देखील दिल्या होत्या. काहींना तिचा हा फोटो रूचला नव्हता तर काहींच्या मात्र प्रंचंड पसंतीस उतरला होता.

 When suhana khan shared cleavage photo on social media, netizens were also shocked | जेव्हा या स्टारकिडने सोशल मीडियावर शेअर केला क्लीवेज फोटो,नेटीझन्सही झाले होते हैराण

जेव्हा या स्टारकिडने सोशल मीडियावर शेअर केला क्लीवेज फोटो,नेटीझन्सही झाले होते हैराण

googlenewsNext

शाहरुख खानची मुलगी सुहान खान अशा स्टार किड्सपैकी आहे जी तिच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करून घेते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये झळकण्यापूर्वीच सुहानाचा मोठा चाहता वर्ग आहे. रूपेरी पडद्यावर झळकेल तेव्हा झळकेल मात्र आज लाखोंच्या संख्येने तिचे चाहते आहे. सोशल मीडियावर तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यात तसा प्रत्येकालाच रस असतो. सोशल मीडियावर अनेक विविध अंदाजामध्ये फोटो तिने शेअर केले आहेत. 

मात्र सर्वाधिक सर्च केलेला फोटो हा सुहानाचा क्लीवेज फोटो आहे. न्यूयॉर्कमध्ये सुहाना शिकते. तिथे तिने क्लिक केलेला हा फोटो आहे. जेव्हा सुहानाने हा फोटो शेअर केला होता. तेव्हा अनेकांच्या मात्र भुवयाच उंचावल्या होत्या. एक कदम आगे असेच काहीसे कमेंटस या फोटोवर उमटल्या होत्या. अनेकांना तिच्या या फोटोवर ट्रोल करत तिला संमिश्र प्रतिक्रीया देखील दिल्या होत्या. काहींना तिचा हा फोटो रूचला नव्हता तर काहींच्या मात्र प्रंचंड पसंतीस उतरला होता.

 

काही दिवसांपूर्वीच सुहानाची मुख्य भूमिका असलेली शॉर्ट फिल्म रिलीज झाली होती. ज्यातील तिचा अभिनय पाहता सर्व स्तरातून तिचं कौतुक केलं जात होतं. त्यानंतर आता तिचा सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा सेल्फी स्वतः सुहानानंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. त्यानंतर तिच्या फॅन पेजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आणि काही क्षणातच हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Web Title:  When suhana khan shared cleavage photo on social media, netizens were also shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.