ठळक मुद्देशक्ती कपूर काहीही न सांगता थेट फरहानच्या घरी गेले होते. शक्ती कपूर यांच्यासोबत श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरे देखील होती. विवाहित आणि दोन मुलांचा बाप असणाऱ्या फरहानसोबत आपल्या मुलीचे प्रेमसंबंध शक्तीला मुळीच मान्य नव्हते.

श्रद्धा कपूरचा बागी ३ हा चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा सोबत ती नात्यात असल्याचे म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, रोहनच्या आधी श्रद्धाचे अभिनेता फरहान अख्तरसोबतचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. 

रॉक ऑन २ या चित्रपटात श्रद्धा आणि फरहानने एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या सेटवर श्रद्धा आणि फरहानमध्ये प्रेम फुलले होते असे म्हटले जाते. दोघांनी याविषयी न बोलणेच पसंत केले असले तरी इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या नात्याविषयी चांगलीच चर्चा रंगली होती. श्रद्धा आणि फरहान एकत्र राहात देखील होते. पण ही गोष्ट तिचे वडील शक्ती कपूर यांना कळल्यानंतर त्यांनी प्रचंड गोंधळ घातला होता असे त्यावेळी बातम्यांमध्ये आले होते. श्रद्धाने तिच्या आईवडिलांच्या घरातून सामानसकट बाहेर पडून थेट फरहानच्या घरात ठाण मांडले होते. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी श्रद्धा फरहानच्या घरी आली होती.

ते दोघे राहत असलेल्या इमारतीमध्ये दोघांच्या नात्याविषयी चर्चा रंगू लागल्या होत्या. पण मोठ्या पडद्यावर खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले श्रद्धाचे वडील शक्ती कपूर हे तिच्या प्रेमजीवनातीलसुद्धा व्हिलन ठरले. शक्ती कपूर काहीही न सांगता थेट फरहानच्या घरी गेले होते. शक्ती कपूर यांच्यासोबत श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरे देखील होती. विवाहित आणि दोन मुलांचा बाप असणाऱ्या फरहानसोबत आपल्या मुलीचे प्रेमसंबंध शक्तीला मुळीच मान्य नव्हते. तिथे श्रद्धा, शक्ती आणि पद्मिनी या तिघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते असे देखील म्हटले जाते. श्रद्धा काहीही केल्या सहजासहजी घरी जाण्यास तयार नव्हती. अखेर शक्तीने जबरदस्ती करून तिला घरी नेले. मीडियाला गॉसिप नको म्हणून श्रद्धा चुपचाप गाडीत बसली अशी देखील चर्चा रंगली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Shakti Kapoor dragged Shraddha out of then-beau Farhan Akhtar's house PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.