When Salman khan insults katrina kaif at sister arpita khan wedding | जेव्हा बहिणीच्या लग्नात सलमानने केला होता कतरिनाचा अपमान, सगळेच झाले होते हैराण!!  

जेव्हा बहिणीच्या लग्नात सलमानने केला होता कतरिनाचा अपमान, सगळेच झाले होते हैराण!!  

ठळक मुद्देकतरिना व रणबीरच्या अफेअरच्या चर्चा जोरात असताना सलमान खान ऐनकेनप्रकारे कतरिनाला डिवचण्याचा प्रयत्न करत होता.

सलमान खानकतरिना कैफच्या रिलेशनशिपच्या चर्चा चाहत्यांसाठी नव्या नाहीत. सलमानचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. कॅट यापैकीच एक.  कॅट व सलमानने कधीच आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली नाही. पण कॅटबद्दलच्या सलमानच्या मनात असलेल्या भावना अनेकदा, अनेकप्रसंगी दिसल्या. पण पुढे कतरिनाच्या आयुष्यात अचानक रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान दुखावला गेला. होय, इतका की आपल्या बहिणीच्या लग्नात सलमानने कतरिनाचा सर्वांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. तिला डिवचण्याची एकही संधी त्याने सोडली नाही.

कतरिना व रणबीरच्या अफेअरच्या चर्चा जोरात असताना सलमान खान ऐनकेनप्रकारे कतरिनाला डिवचण्याचा प्रयत्न करत होता. करण जोहरच्या शोमध्ये एका प्रश्नावर सलमानने असे काही उत्तर दिले होते की, सगळेच हैराण झाले होते. 
‘तू कतरिना कैफ बसून सकाळी उठलास तर तुझी सर्वात पहिली रिअ‍ॅक्शन काय असेल?, असा प्रश्न करण जोहरने सलमानला केला होता. यावर ‘रणबीर तुम कहा हो...,’ असे उत्तर सलमानने दिले होते.

बहीण अर्पिताच्या लग्नातही सलमानने कतरिनाचा सर्वांसमोर अपमान केला होता. या लग्नात कतरिना स्वत: हजर होती. लग्नाचे तिचेच ‘चिकनी चमेली’ हे गाणे वाजत होते. हे गाणे सुरु होताच सलमानने कतरिनाला स्टेजवर डान्स करण्यासाठी बोलवले.  पण कतरिनाने नकार दिला. यावर अच्छा कतरिना कैफ नाही कतरिना कपूर... आत्ता तर डान्स करायला ये, असे सलमान म्हणाला होता. मी तुला कतरिना कैफ बनण्याची संधी दिली. पण तुला तर कतरिना कपूर बनायचे होते, असेही तो पुढे म्हणाल्याचे म्हटले जाते. सलमानचे हे शब्द ऐकून सगळेच दंग झाले होते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Salman khan insults katrina kaif at sister arpita khan wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.