जेव्हा रिया सेनने चक्क वेटरकडेच केली होती या गोष्टीची डिमांड?रियल लाईफमध्येही आहे खुपच Bold

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 04:31 AM2017-09-16T04:31:22+5:302017-09-16T10:01:22+5:30

अभिनेत्री रिया सेननं आपल्या अभिनयापेक्षा तिच्या मादक अदांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे. बिनधास्त, बेधडक अंदाजात रुपेरी पडद्यावर दिसणारी रिया ...

When Riya Sen did a great deal of waiter, did she ever have to? Bold in Real Life | जेव्हा रिया सेनने चक्क वेटरकडेच केली होती या गोष्टीची डिमांड?रियल लाईफमध्येही आहे खुपच Bold

जेव्हा रिया सेनने चक्क वेटरकडेच केली होती या गोष्टीची डिमांड?रियल लाईफमध्येही आहे खुपच Bold

googlenewsNext
िनेत्री रिया सेननं आपल्या अभिनयापेक्षा तिच्या मादक अदांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे. बिनधास्त, बेधडक अंदाजात रुपेरी पडद्यावर दिसणारी रिया रियल लाइफमध्येसुद्धा तितकीच बिनधास्त आणि बोल्ड आहे. शीना बोबरा या बहुचर्चित हत्याकांडावर बनलेल्या डार्क चॉकलेट या सिनेमात रियानं शीना बोराची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी एका शॉर्ट फिल्ममध्ये लेस्बियनची भूमिका साकारताना रसिकांनी पाहिलंय. गेल्या काही महिन्यांपूर्वी रियासोबत एका रेस्टॉरंटमध्ये असं काही घडलं  होतं जे ऐकून तुम्हाला हसावं की काय करावं असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. रिया मुंबईच्या अंधेरीतील एका रेस्टॉरंटमध्ये पोहचली. या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही पोहचलात की एका खास मेन्यूवर तुमचं लक्ष जाईल.मेन्यू कार्डमधील नॉटी आयटम म्हणजे इथलं एक कॉकटेल ज्याचं नाव आहे सेक्स ऑन द बीच. रेस्टॉरंटमध्ये येणा-यांच्या ऑर्डरनुसार ते बनवलं जातं. रिया ज्यावेळी तिथे पोहचली तेव्हा तिला काही पिण्याची इच्छा नव्हती. त्याऐवजी तिला अंड्यापासून बनलेली डिश खाण्याची इच्छा होती. आश्चर्यजनक बाब म्हणजे रेस्टॉरंटनं रियाला एग्स ऑन द बीच नावाची डिश ऑफर केली. यावेळी रिया खूप थकलेली होती त्यामुळे पार्टनरसह मेन्यूविषयी गप्पांमध्ये ती दंग झाली. तेव्हा अचानक वेटरने रियाला ऑर्डरसाठी विचारणा केली. त्यावेळी रियाच्या तोंडून अचानक निघालं की, could I have Some SEX please. रियाच्या तोंडून हे वाक्य ऐकून वेटरचा चेहरा लाजेनं अक्षरक्ष: लालेलाल झाला. रियाला काय उत्तर द्यावं, काय बोलावं हे त्याला सुचत नव्हतं. मात्र वेटरच्या चेह-यावरचे भाव, त्याची ती अवस्था पाहून आपण नक्कीच काही तरी भलतंच आणि चुकीचं बोललो याची उपरती रियाला झाली. तात्काळ रियानं आपली चूक सुधारली. वेटरला तिने पुन्हा एकदा ऑर्डर दिली आणि म्हणाली की, could I have some eggs please ? यावेळी वेटरनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तो हसलासुद्धा नाही. या सगळ्या प्रकारानंतर रियाला हसू आवरलंच नाही.

Also Read:LEAKED!! Ragini MMS Returnsमधील रिया सेनचा हॉट लवमेकिंग व्हिडिओ viral!

Web Title: When Riya Sen did a great deal of waiter, did she ever have to? Bold in Real Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.