अमिताभ आणि रेखा यांचा सिलसिला जगजाहिर आहे. अगदी सुरुवातीपासून अमिताभ आणि रेखाच्या अफेयरच्या खुमासदार चर्चा रंगल्या...प्रत्येकवेळी त्याची चर्चा झाली.. खुद्द रेखानंही एका जुन्या मुलाखतीमध्ये अमिताभबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र जयाशी रेशीमगाठीत अडकल्यावर सिलसिलानंतर दोघांनीही एका सिनेमात काम केलं नाही. असं असलं तरी नशिबाचा खेळ म्हणा किंवा योगायोग... पुरस्कार सोहळा असो किंवा एखादा कार्यक्रम दोघांचीही नजरानजर होतेच. जेव्हा -जेव्हा रेखा यांचा विषय येतो तेव्हा -तेव्हा अमिताभ यांचा रेखा यांच्याशी असलेला सिलसिला नाही आठवला तरच नवल.

एकदा फोटोग्राफर डब्बु रत्नानीच्या कॅलेंडर लॉन्चवेळी वेगवेगळ्या बॉलिवूड सेलिब्रेटींनी आपल्या खास स्टायलिश अंदाजात हजेरी लावली होती. मात्र या सा-यांमध्ये लक्ष वेधून घेतले ते रेखा यांनी. व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये  डब्बु रत्नानी यांच्या बच्चेकंपनीसह मस्त फोटो काढण्यात व्यस्त दिसत आहे. हे झाल्यानंतर त्यांनी खास मीडियाला फोटो देण्यासाठी एका जागी उभ्या राहतात. त्याचवेळी त्या  पाठीवळून  पाहतात तर  तिथे अमिताभ यांचा फोटो लावलेला दिसतो. 

अमिताभ यांचा फोटो पाहताच रेखा यांनी क्षणाचाही विलंब न लावता आश्चर्यचकीत होत तिथून काढता पाय घेतात. अमिताभ यांचा फोटो पाहून थबकलेल्या रेखा यांची ही गोंधळलेली अवस्था मात्र मीडियाच्या कॅमे-यात कॅप्चर झाली आहे. सध्या रेखा यांचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा तुफान व्हायरल झाला आहे.  

 

हा व्हीडीओ पाहून नेटीझन्स मात्र आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हा व्हीडीओ जरा जया बच्चन यांनाही दाखवा. तुर्तास या व्हीडीओमुळे पुन्हा एकदा प्रत्यक्षरित्या-अप्रत्यक्षरित्या अमिताभ-रेखाचा सिलसिला संपला नाही तर तो सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Rekha runs from Amitabh Bachchan's photo in viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.