"अरे हा भारत आहे, अमेरिका नाही", प्रियंका चोप्राच्या भावजयला पाहताच भडकले होते लोक, काय होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 02:12 PM2021-07-29T14:12:48+5:302021-07-29T14:23:15+5:30

प्रियंका आणि निकच्या लग्नासाठी सोफी टर्नर जेव्हा भारतात आली होती. यावेळेस तिचे हॉट अवतारातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

When Priyanka Chopra Jonas Sister In Law Sophie Turner Brutally Trolled For Hot Dress Look | "अरे हा भारत आहे, अमेरिका नाही", प्रियंका चोप्राच्या भावजयला पाहताच भडकले होते लोक, काय होते कारण

"अरे हा भारत आहे, अमेरिका नाही", प्रियंका चोप्राच्या भावजयला पाहताच भडकले होते लोक, काय होते कारण

Next

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. प्रियंका तिच्या लग्नानंतर तिच्या खासगी कारणांमुळे जास्त चर्चेत असते. कधी तिच्या स्टायलिश लूकमुळे तर कधी पती निक जोनासमुळे.आता तर प्रियंका तिच्या भावजयमुळे चर्चेत आली आहे. पण यावेळी तिचे कौतुक होत नसून तिच्यावर प्रचंड संतप्त प्रतिक्रीया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

भावजयीबरोबर प्रियंकालाही सोशल मीडियावर खरीखोटी सुनावली जात आहे. प्रियंकाचे भावजयसोबतचे जुने फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत. प्रियंकाही अनेकदा बोल्ड ड्रेसिंग स्टाईलमुळे नेटीझन्सच्या निशाण्यावर आली आहे. यावेळी भावजय सोफी टर्नरचाही बोल्ड लुक पाहून नेटिझन्स प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळालं. तिचा लूक पाहताच नेटीझन्स राग व्यक्त करताना दिसले. इतकेच काय तर ती भारतात आहे अमेरिकेत नाही याचीही आठवण तिला करुन देताना दिसले. 

प्रियंका आणि निकच्या लग्नासाठी सोफी टर्नर जेव्हा भारतात आली होती. यावेळेस तिचे हॉट अवतारातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.  बोल्ड लुकमुळे लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले होते. सोशल मीडियावर प्रियंका चोप्राला ट्रोल करणे काही नवीन नाही. पण आता नेटीझन्स प्रियंकाच्या सासरच्या मंडळींनाही ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाही. 

विशेष म्हणजे सेलिब्रेटींनाही ट्रोलिंगचा अजिबात फरक पडत नाही. त्यामुळे  इतक्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल केल्यानंतरही सोफीनं तोच ड्रेस घातल्याचं पाहायला मिळालं होतं. इतकंच काय तर तिच्या प्रेग्नेंसीदरम्यानही तिने तोच ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळाले होते. अभिनेत्री सोफी टर्नरने निक जोनासचा भाऊ पॉप सिंगर जो जोनससोबत लग्न केले आहे. 

गेल्याचवर्षी सोफीने मुलीला जन्म दिला होता. दोघांनी विला असं मुलीचं नाव ठेवलं होतं. जो आणि सोफीने त्यांच्या मुलीच्या जन्माची गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.प्रियंका चोप्रानेही काकू झाल्याचा आनंद सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Priyanka Chopra Jonas Sister In Law Sophie Turner Brutally Trolled For Hot Dress Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app