ठळक मुद्देहिमांश कोहलीसोबत झालेल्या या ब्रेकअपनंतर सावरत असतानाच नेहाच्या आयुष्यात रोहनप्रीतची एन्ट्री झाली आणि गेल्यावर्षी नेहा रोहनप्रीतसोबत लग्नबंधनात अडकली.

नेहा कक्कर (Neha Kakkar) किती हळवी आहे, हे सांगायची गरज नाही.  लाईव्ह इव्हेंट असो की टीव्ही शो अनेकदा नेहाच्या डोळ्यांतून घळाघळा वाहणारे अश्रू चाहत्यांनी बघितले आहे. तूर्तास नेहाचा असाच एक लाईव्ह कॉन्सर्टमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ आहे, नेहाच्या ब्रेकअपनंतरचा. या व्हिडीओत नेहा स्टेज परफॉर्मन्स देतेय आणि राहून राहून तिचे डोळे भरून येत आहेत. अश्रूंचा बांध फुटतोय आणि नेहा ते पुसण्याचा प्रयत्न करतोय. (when Neha Kakkar was crying in front of audience in live Show )
हा इव्हेंट आहे अहमदाबादचा. या व्हिडीओत नेहा ‘माही वे’ हे गाणे गाताना दिसतेय. 

स्टेजवर गाता गाता नेहा तिचे अश्रू रोखू शकत नाही. तिची ती अवस्था बघून चाहते ‘डोन्ट क्राय नेहा,’‘नेहा रडू नकोस’ असे जोरजोरात ओरडत आहेत. चाहत्यांचा मान राखून नेहा मोठ्या प्रयत्नाने कसे बसे गाणे गाते. माझ्या पर्सनल लाईफमध्ये काहीही घडो, पण मी इथे तुमच्यासाठी आली आहे़ तुमच्यासाठी उभी आहे..., असे व्हिडीओच्या शेवटी ती चाहत्यांना म्हणते.

तुम्हाला माहित आहेच की, नेहा कक्कर एकेकाळी हिमांश कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. हिमांशूसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नेहा आतून कोलमडली होती. अगदी डिप्रेशनमध्ये गेली होती.
या ब्रेकअपवर हिमांशही बोलला होता. ब्रेकअपसाठी अनेक कारणे होती. पण रिअल स्टोरी कोणालाही माहित नव्हती. असे असूनही ती रडली आणि लोकांनी मलाच विलन ठरवले, सगळ्यांनी या ब्रेकअपसाठी मलाच दोषी ठरवले, असे तो म्हणाला होता.

हिमांश कोहलीसोबत झालेल्या या ब्रेकअपनंतर सावरत असतानाच नेहाच्या आयुष्यात रोहनप्रीतची एन्ट्री झाली आणि गेल्यावर्षी नेहा रोहनप्रीतसोबत लग्नबंधनात अडकली. सध्या नेहा रोहनप्रीतसोबत अगदी आनंदाने संसार करतेय.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: when Neha Kakkar was crying in front of audience in live Show after her breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.