डेली सोप क्वीन एकता कपूर गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. एकताही खाजगी आणि व्यावसायिक कारणामुळे चर्चेत असते. सध्या  एकता कपूर आपलं करीअर आणि मदरहूडचा चांगला अनुभव घेत जीवन जगत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर इतर मॉम्सप्रमाणे एकता सुद्धा आपल्या मुलासोबतचे फोटो शेअर करत असते.एकताविषयी जाणून घेण्यासाठी तिचे चाहतेही खूप उत्सुक असतात. तिच्याबाबीत एक किस्साही खूप चर्चेत असतो. ते म्हणजे एकता कपूर वयाची ४३ वर्ष पूर्ण केल्यानंतरही एकता सिंगल आहे. सरोगसीच्या माध्यमातून ती देखील इथर सेलिब्रेटींप्रमाणे सिंगल मदर बनली.

एकताच्या लग्नाचा विषय येतो तेव्हा करण जोहरवरही चर्चा झालीच समजा.एकता आणि करण जोहर  दोघेही आज यशस्वी निर्मात्यांच्या यादीमध्ये गणले जातात. तसेच एकता कपूर आणि करण जोहर या दोघांमध्ये चांगले मैत्रीचे नाते देखील आहे. ते दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा झाल्या होत्या. एका मुलाखतीत करण जोहरने आपल्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला होता. 

करण जोहर म्हणाला  होता की मी आणि एकता योग्य जोडीदार शोधत आहोत. जर आम्हाला योग्य जोडीदार सापडला नाही तर आम्ही एकमेकांशी लग्न करू.शकतो.मात्र मैत्रीपलीकडे या दोघांचे नाते पुढे गेलेच नाही. शेवटी दोघांनीही सरोगसीद्वारे सिंगल पॅरेंट बनत आपले आयुष्य एन्जॉय करत आहेत.

दरम्यान  "मला लग्न करायचं नाही," असं एकताने अनेकदा सांगितलं होतं. पण तीन वर्षांपूर्वी जेव्हा तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यचा जन्म झाला होता, तेव्हा एकतानेही आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. जबाबदारी स्वीकारण्यायोग्य झाले तर मला आई बनायला आवडेल, असं एकता म्हणाली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Karan Johar and Ekta Kapoor were all set to marry each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.