ठळक मुद्देकंगना रणौत आणि हृतिकचे ब्रेकअप झाल्यानंतर श्वेता बच्चनसोबत हृतिक नात्यात होता असे म्हटले जाते.

हृतिक रोशन आणि कंगना रणौतचे प्रेमप्रकरण मीडियात चांगलेच गाजले होते. कंगनाने हृतिकवर अनेक आरोप देखील केले होते. पण त्याने याबाबत काहीही न बोलणेच पसंत केले होते. हृतिक रोशनचे लग्न सुझान खानसोबत झाले होते सुझान ही प्रसिद्ध अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. सुझान आणि हृतिक लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले. पण हे लग्न काहीच वर्षांत मोडले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. याच दरम्यान अभिनेत्री कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांचे अफेअर सुरू झाले असे म्हटले जाते. पण कंगनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर हृतिक एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या विवाहित मुलीसोबत नात्यात होता हे तुम्हाला माहीत आहे का?

कंगना रणौत आणि हृतिकचे ब्रेकअप झाल्यानंतर श्वेता बच्चनसोबत हृतिक नात्यात होता असे म्हटले जाते. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, कंगनासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर हृतिकच्या आयुष्यात श्वेता आली. श्वेता आणि हृतिक हे लहानपणापासूनचे फ्रेंड्स आहेत. पण लग्नानंतर ते दोघे आपापल्या आयुष्यात बिझी असल्याने ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. पण कंगनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर हृतिक आणि श्वेता अनेक पार्टी, इव्हेंटमध्ये एकत्र जात होते. केवळ प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात त्यांना कैद केले जाऊ नये याची ते काळजी घ्यायचे. बच्चन कुटुंब आणि हृतिकचे खूप जवळचे नाते आहे. अभिषेक बच्चन आणि हृतिक देखील खूप चांगले फ्रेंड्स आहेत. कुणाल कपूरच्या लग्नात श्वेता आणि हृतिकची अनेक वर्षांनी पुन्हा भेट झाली अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. पण कंगनाच्या कॉन्ट्रोव्हर्सीनंतर श्वेताने हृतिकपासून दूर राहाणेच पसंत केले असे देखील म्हटले जाते.

श्वेता नंदाने निखिल नंदासोबत लग्न केले असून त्यांना दोन मुलं आहेत. पण गेल्या अनेक वर्षांपासून निखिल दिल्ल्लीत तर श्वेता अधिकाधिक काळ मुंबईत राहाते. त्यामुळे त्यांच्यात काही प्रोब्लेम सुरू आहेत अशा देखील चर्चांना ऊत आले होते. पण निखिलची आई रितू नंदा यांच्या निधनानंतर श्वेता आणि निखिल यांना पुन्हा एकत्र पाहाण्यात आले. या दुःखात अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब निखिलच्या पाठिशी उभे राहिले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Hrithik distanced himself from Kangana Ranaut and reconnected friendship with Shweta Bachchan PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.