When Drunk Swara Bhaskar Angry Reaction In front of Media When Spotted Without Makeup At Medical Store | दिवसभर बिनधास्त फिरत होती बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री,पण कोणीही तिला ओळखले नाही

दिवसभर बिनधास्त फिरत होती बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री,पण कोणीही तिला ओळखले नाही

स्वरा भास्कर तिच्या अभिनयाइतकीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे ओळखली जाते. ती देशात सुरू असलेल्या विविध घटनांवर रोखठोक भाष्य करताना दिसते. ती सोशल मी़डियावर चांगलीच सक्रिय असून तिचे फॅन्स तिला सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलो करतात. स्वराच्या मतांशी काही वेळा लोक सहमत असतात तर काहीजण तिला सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसतात.

स्वरा एका मेडीकल शॉपमध्ये गेली असताना हा फोटो मीडियाच्या कॅमे-यात कैद झाला होता. हा फोटो पाहून काहींनी तिला ओळखलेही नाही.मात्र ज्यांनी ज्यांनी स्वराला या फोटोत ओळखले. त्यांनी तिचे कौतुकच केले. तर काही तिचा विनामेकअप लूक पाहून आवाक झाले होते. एरव्ही ग्लॅमरस अंदाजात फिरणारी स्वरा भास्करचा रिअल लूक यापूर्वी कोणी पाहिला नव्हता. त्यामुळे पहिल्यांदाच तिला पाहून सारेच थक्क झाले होते. विनामेकअप असलेल्या स्वराचा यावेळी डेनिम जॅकेटमध्ये स्पोर्टी लूकने रसिकांची पसंती मिळवली होती. यात काहींनी तिच्या या धाडसाचेही कौतुक केले. मीडियाच्या कमॅरे पाहताच स्वरा थोडी थबकली आणि मीडिया फोटोग्राफरवरच ती भडकल्याचेही पाहयला मिळाले.पण स्वराच्या या लूकमुळे तिला ट्रोलर्सचाही सामना करावा लागला होता.

कंचराकुंडीत सापडलेल्या मुलीच्या पालनपोषणाची स्वरा भास्करने घेतली जबाबदारी

स्वराने कचरापेटीमध्ये सापडलेल्या एका मुलीला दत्तक घेतलं आहे. या मुलीसोबतचे फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. स्वरा नुकतीच तिच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश येथील बदायुला गेली होती. त्यावेळी तिने तेथील एका अनाथाश्रमाला भेट दिली होती. तिथल्या अनाथाश्रमाला एखादी मदत करावी या हेतूने ती तिथे गेली होती. पण तिथे गेल्यानंतर एका लहान मुलीची कथा ऐकून तिला प्रचंड वाईट वाटले. ही चिमुकली मुलगी त्या अनाथआश्रमाच्या संचालिका प्रियांका जौहरी यांना एका कचऱ्याच्या डब्यात सापडली होती.

तिची ही गोष्ट ऐकून स्वराला आपले अश्रू आवरले नाही आणि तिने या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. स्वराने या मुलीला दत्तक घेतले असले तरी ही मुलगी काही काळासाठी त्या अनाथाश्रमामध्येच राहाणार आहे. तिचा पालनपोषणाचा. शिक्षणाचा सगळा खर्च स्वरा उचलणार आहे. ही मुलगी मोठी झाल्यानंतर स्वरा तिला आपल्या घरी घेऊन जाणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Drunk Swara Bhaskar Angry Reaction In front of Media When Spotted Without Makeup At Medical Store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.