कंचराकुंडीत सापडलेल्या मुलीच्या पालनपोषणाची स्वरा भास्करने घेतली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:43 AM2021-04-15T11:43:55+5:302021-04-15T14:45:38+5:30

स्वराने कचरापेटीमध्ये सापडलेल्या एका मुलीला दत्तक घेतलं आहे. या मुलीसोबतचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून हे फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

swara bhaskar adopted girl child | कंचराकुंडीत सापडलेल्या मुलीच्या पालनपोषणाची स्वरा भास्करने घेतली जबाबदारी

कंचराकुंडीत सापडलेल्या मुलीच्या पालनपोषणाची स्वरा भास्करने घेतली जबाबदारी

googlenewsNext
ठळक मुद्देस्वरा नुकतीच तिच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश येथील बदायुला गेली होती. त्यावेळी तिने तेथील एका अनाथाश्रमाला भेट दिली होती.

स्वरा भास्कर तिच्या अभिनयाइतकीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे ओळखली जाते. ती देशात सुरू असलेल्या विविध घटनांवर रोखठोक भाष्य करताना दिसते. ती सोशल मी़डियावर चांगलीच सक्रिय असून तिचे फॅन्स तिला सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलो करतात. स्वराच्या मतांशी काही वेळा लोक सहमत असतात तर काहीजण तिला सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसतात. पण आता एका कारणामुळे स्वरा भास्करचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. 

स्वराने कचरापेटीमध्ये सापडलेल्या एका मुलीला दत्तक घेतलं आहे. या मुलीसोबतचे फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. स्वरा नुकतीच तिच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश येथील बदायुला गेली होती. त्यावेळी तिने तेथील एका अनाथाश्रमाला भेट दिली होती. तिथल्या अनाथाश्रमाला एखादी मदत करावी या हेतूने ती तिथे गेली होती. पण तिथे गेल्यानंतर एका लहान मुलीची कथा ऐकून तिला प्रचंड वाईट वाटले. ही चिमुकली मुलगी त्या अनाथआश्रमाच्या संचालिका प्रियांका जौहरी यांना एका कचऱ्याच्या डब्यात सापडली होती. तिची ही गोष्ट ऐकून स्वराला आपले अश्रू आवरले नाही आणि तिने या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. स्वराने या मुलीला दत्तक घेतले असले तरी ही मुलगी काही काळासाठी त्या अनाथाश्रमामध्येच राहाणार आहे. तिचा पालनपोषणाचा. शिक्षणाचा सगळा खर्च स्वरा उचलणार आहे. ही मुलगी मोठी झाल्यानंतर स्वरा तिला आपल्या घरी घेऊन जाणार आहे. 

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे अतिशय वाईट वातावरण बाहेर आहे. त्यात स्वराला लहान मूल सांभाळण्याची सवय नाहीये. त्यामुळे या काहीच महिन्याच्या बाळाला स्वरा चांगल्याप्रकारे सांभाळू शकेल का याची सगळ्यांना चिंता लागली होती. त्यामुळे स्वराने बाळाला अनाथाश्रमातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: swara bhaskar adopted girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.