बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोणचे सध्या बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन प्रकरणात नाव समोर आल्यापासून वादात सापडली आहे. दीपिका मुंबईत 12 लोकांच्या लीगल टीमशी व्हिडीओ कॉलने संपर्कात आहेत. दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंग या टीमचा भाग आहे. एनसीबीने दीपिकाला 25 सप्टेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दीपिका आज(गुरुवारी) मुंबईत परत येऊ शकते अशी माहितीही समोर येत आहे.  गेल्या आठवड्यात दीपिका सध्या धर्मा प्रोडक्शनच्या सिनेमाचे गोव्यात शूटिंग करत आहे. 

 

दीपिका वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही  #meetoo अभियानावर केलेल्या वक्यव्यामुळे ती वादात सापडली होती. त्यावेळी अनेक अभिनेत्री त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणावर बोलत होत्या. त्याचदम्यान दीपिकानेही ज्या व्यक्तीने लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. किंवा लैंगिक शोषण केले आहे अशा व्यक्तीच्या सिनेमात कधीच काम करणार नसल्याचे व्होग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. मात्र हे वक्तव्य करण्यापूर्वीच लव्ह रंजनच्या घरी तिला पाहिले गेले होते. त्यावेळी एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसह लव्ह रंजनच्या सिनेमात ती काम करणार असल्याचेही बातम्या समोर आल्या होत्या.

 

लव्ह रंजनवर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. २०१० मध्ये या सिनेमाच्या ऑडीशनदरम्यान लव रंजने तिला कपडे उतरवण्यास सांगितले होते असा या महिलेने त्याच्यावर आरोप केला होता. ऑडिशनसाठी ड्रेस कोड ठरवला गेला होता. त्यानुसार शॉर्ट स्कर्ट आणि टाइट टॉप घालून ऑडीशन द्यायचे होते. त्यावेळी तिथे सात ते आठ मुली ऑडीशनसाठी आल्या  होत्या. ही लूक टेस्ट होती. मी कुमार मंगतच्या ऑफिसमध्ये होते.

लव्ह रंजनही तेथे उपस्थित होता. तो मुलींना आत बोलावत होता. माझ्या लक्षात आले की माझ्या आधी खोलीतून आत गेलेली मुलगी अस्वस्थ दिसत होती आणि ताबडतोब खोलीच्या बाहेर गेली. मात्र जेव्हा मला ऑडीशनसाठी आतमध्ये बोलवण्यात आले तेव्हा लव्ह रंजन गैरवर्तन केल्याचे कळाले असले या महिलेने सांगितले होते.


 
लैंगिक शोषण करणा-या व्यक्तीसह काम करणार नसल्याचे सांगणारी दीपिका अशाच व्यक्तीसह काम करत असल्याचे पाहून सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली होती. सोशल मिडीयावर #NotMyDeepika हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. लैंगिक छळाविरूद्ध  दीपिकाने ठाम पवित्रा घेतल्याचे तिच्या चाहत्यांना तिच्याविषयी अभिमान वाटत होता. मात्र दीपिकाचे सिनेमात काम करणार असल्याचे वाचून अनेकांनी त्यावर आक्षेप घेत दीपिकाने सिनेमात काम करू नये. आपला शब्द पाळावा असेही म्हटले होते. यानंतर तिला “ढोंगी” असे बोलत तिची खिल्लीही उडवली गेली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Deepika Padukone Was Slammed For Being ‘A Hypocrite'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.