अक्षय कुमारच्या पहिल्या स्क्रिन टेस्टचा व्हिडीओ पाहिलात का? पाहून खुद्द अक्कीलाही आवरेना हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:36 PM2021-05-18T19:36:58+5:302021-05-18T19:37:25+5:30

Akshay Kumar First Screen Test Video: अक्षयच्या एका फॅनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तूर्तास या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

when akshay kumar laughed after seeing his first screen test video | अक्षय कुमारच्या पहिल्या स्क्रिन टेस्टचा व्हिडीओ पाहिलात का? पाहून खुद्द अक्कीलाही आवरेना हसू

अक्षय कुमारच्या पहिल्या स्क्रिन टेस्टचा व्हिडीओ पाहिलात का? पाहून खुद्द अक्कीलाही आवरेना हसू

Next
ठळक मुद्देअक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या त्याच्या हातात अनेक सिनेमे आहेत.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजे आजचा बॉलिवूडचा सर्वात बिझी स्टार. गेल्या 30 वर्षांपासून अक्की इंडस्ट्रीत आहेत. या काळात अनेक आलेत, अनेक गेलेत, पण अक्षयची क्रेज जराही कमी झालेली नाही. आत्ताही त्याला घेण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक उत्सुक दिसतात. अक्षयने करिअरची सुरूवात केली ती मॉडेलिंगपासून. पुढे त्याला जाहिरातीत संधी मिळाली आणि नंतर त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 1991 साली रिलीज झालेला ‘सौगंध’ हा अक्षयचा पहिला सिनेमा होता. पण हा सिनेमाही त्याला सहज मिळाला नव्हता तर यासाठी अनेक अ‍ॅक्टर्सप्रमाणे त्यालाही स्क्रिन टेस्टमधून जावं लागलं होतं. ( Akshay Kumar First Screen Test Video)
तूर्तास अक्षयच्या स्क्रीन टेस्टचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ दिवंगत अभिनेते फारूख शेख (Farooq Shaikh) यांच्या ‘जीना इसी का नाम है’ या चॅट शोचा अंश आहे. यात फारूख शेख अक्षयला त्याच्या पहिल्या स्क्रिन टेस्टचा व्हिडीओ दाखवत आहेत.

व्हिडीओत अक्षय मार्शल आर्टच्या काही मुव्स करताना दिसतोय. यानंतर अभिनेत्री नगमासोबत तो एक डायलॉगही म्हणताना दिसतोय.
स्वत:च्या पहिल्या स्क्रिन टेस्टचा हा व्हिडीओ पाहताना अक्षयला स्वत:लाही हसू आवरले नव्हते. किती मोठे केस होते, असे हसत हसत तो म्हणतोय. अक्षयच्या एका फॅनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तूर्तास या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.
अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या त्याच्या हातात अनेक सिनेमे आहेत.  बेलबॉटम, पृथ्वीराज, रामसेतू, अतरंगी रे हे चित्रपट त्याच्या हातात आहेत. त्याचा ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट मागील वर्षभरापासून प्रदर्शनासाठी सज्ज आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे प्रदर्शन रखडले आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: when akshay kumar laughed after seeing his first screen test video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app