बॉलिवूडचे सुपर रोमँटीक कपल अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना त्यांच्यामधील रोमँटीक केमिस्ट्रीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यांची लव्हस्टोरी तर सिनेमाच्या कथेला साजेल अशीच आहे. नेहमीच त्यांच्या लग्नाचे किस्से जाणून घेण्यासाठी चाहतेदेखील खूप उत्सुक असतात. असाच एक किस्सा म्हणजे जेव्हा लेडी लव्ह ट्विंकल खन्नाचा वाढदिवसच विसरला त्यानंतर एका नव-याची अवस्था काय होणार तशीच त्याचीही झाली होती. खुद्द अक्षयनेच हा किस्सा सांगितला होता. 

अक्षय म्हणाला, “खरंच मी तिचा वाढदिवस विसरलो होतो. मग जेव्हा मला समजले की तिचा वाढदिवस आहे, तेव्हा तिच्यासाठी खास गिफ्ट घेण्यासाठीही पुरेसा वेळ नव्हता. मग घरातल्या घरातच जुगाड करत अक्षयने पत्नीला वाढदिवशी एक पेपरवेट भेट दिली होती.

ते गिफ्ट पाहून ट्विंकलने त्याला सांगितले होते की, एक दिवस तू मला या पेपरवेटपेक्षा मोठा डायमंड खरेदी करशील." हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. आतापर्यंत ज्या -ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी देखील रंजक प्रतिक्रिया देत पसंती दिली होती.

इतकेच नाही तर लग्न करण्याआधी ट्विंकलने त्याच्यापुढे एक अट ठेवली होती. ट्विंकलने त्याला सांगितले होते की, माझा लवकरच प्रदर्शित होणारा मेला हा चित्रपट फ्लॉप ठरला तरच मी तुझ्याशी लग्न करेन...

हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि त्या दोघांनी 7 जानेवाली 2001 मध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. अक्षय आणि ट्विंकलचे लग्न अबू जानी आणि संदीप खोसला या प्रसिद्ध डिझायरांच्या घरी 50 लोकांच्या उपस्थितीत झाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When Akshay Kumar forgot Twinkle Khanna’s birthday, so she made him buy her a huge diamond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.